उत्तर प्रदेशातील बांदा जिल्ह्यातून एक खळबळजनक घटना समोर आली आहे. लग्नाला महिना उलटत नाही तोच एक नववधू आपल्या डॉक्टर पतीला सोडून आपल्या बॉयफ्रेंडसोबत पसार झाली आहे. या घटनेमुळे परिसरात आणि कुटुंबात मोठी खळबळ उडाली असून पतीने पोलिसांत धाव घेत आपल्या पत्नीचा शोध घेण्याची विनंती केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, हा तरुण व्यवसायाने वेटनरी डॉक्टर आहे. १९ फेब्रुवारी रोजी त्याचं लग्न नरैनी पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहणाऱ्या एका तरुणीशी झालं होतं. लग्नानंतर महिनाभर सर्व काही सुरळीत सुरू होतं, मात्र २२ मार्चच्या रात्री अचानक या कथेला वेगळं वळण मिळालं. पतीच्या आरोपानुसार, त्या रात्री उशिरा एका कारमधून तीन तरुण आले आणि त्याच्या पत्नीला फूस लावून आपल्यासोबत घेऊन गेले.
दागिने आणि पैसे लंपास
पत्नी बेपत्ता झाल्याचं समजताच पतीने नातेवाईक आणि ओळखीच्या लोकांकडे तिची खूप विचारपूस केली, मात्र काहीच शोध लागला नाही. पतीने तक्रारीत म्हटलं आहे की, घरातून जाताना पत्नी सोन्या-चांदीचे दागिने आणि रोख रक्कमही सोबत घेऊन गेली आहे. या अनपेक्षित घटनेमुळे संपूर्ण कुटुंबाला मोठा धक्का बसला आहे.
व्हिडीओग्राफरशी होते संबंध
तपासादरम्यान एक महत्त्वाची माहिती समोर आली आहे. पतीच्या म्हणण्यानुसार, त्याची पत्नी गेल्या दोन वर्षांपासून एका तरुणाच्या संपर्कात होती. धक्कादायक बाब म्हणजे, तो तरुण त्यांच्या एका कौटुंबिक कार्यक्रमात व्हिडिओग्राफर म्हणून आला होता. तेव्हापासूनच त्यांच्यात प्रेमसंबंध असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.
कालिंजर पोलीस ठाण्याचे प्रभारी सुखराम सिंह यांनी दिलेल्या माहितीनुसार, पतीच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस सध्या महिलेचा शोध घेत असून मोबाईल लोकेशनच्या आधारे तिचा शोध घेण्याचे प्रयत्न सुरू आहेत. ज्या तरुणावर संशय व्यक्त केला जात आहे, तो आधीपासूनच या कुटुंबाच्या संपर्कात असल्याचं प्राथमिक तपासात निष्पन्न झालं आहे.
Web Summary : In Uttar Pradesh, a newlywed bride absconded with her videographer boyfriend, just a month after marrying a veterinary doctor. She allegedly took jewelry and cash, prompting the husband to file a police complaint. The couple's relationship reportedly began during a family event where the videographer was working.
Web Summary : उत्तर प्रदेश में एक नवविवाहित दुल्हन शादी के एक महीने बाद ही अपने वीडियोग्राफर प्रेमी के साथ भाग गई। कथित तौर पर वह गहने और नकदी भी ले गई, जिसके बाद पति ने पुलिस में शिकायत दर्ज कराई। बताया जा रहा है कि वीडियोग्राफर से उसका प्रेम संबंध एक पारिवारिक कार्यक्रम के दौरान शुरू हुआ था।