बॅडमिंटन कोचनं नग्न फोटो मागितला, तिनं आजीच्या मोबाईलवरून पाठवला अन्...; चौकशीत झाला धक्कादायक खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 7, 2025 13:34 IST2025-04-07T13:34:19+5:302025-04-07T13:34:55+5:30

कर्नाटकची राजधानी असलेल्या बेंगळुरू मधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे...

Badminton coach asked for nude photo, she sent it from grandmother's mobile now Shocking revelation during investigation coach arrested | बॅडमिंटन कोचनं नग्न फोटो मागितला, तिनं आजीच्या मोबाईलवरून पाठवला अन्...; चौकशीत झाला धक्कादायक खुलासा

बॅडमिंटन कोचनं नग्न फोटो मागितला, तिनं आजीच्या मोबाईलवरून पाठवला अन्...; चौकशीत झाला धक्कादायक खुलासा

कर्नाटकची राजधानी असलेल्या बेंगळुरू मधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथे एका बॅडमिंटन कोचवर १६ वर्षीय मुलीवर अत्याचार केल्याचा आरोप करण्यात आला आहे. संबंधित मुलीच्या तक्रारीवरून पोलिसांनी या बॅडमिंटन कोचला अटक केली आहे. पीडित मुलगी आरोपीकडे बॅडमिंटनची प्रशिक्षण घेत होती.

अनेकवेळा लैंगिक शोषण -
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अल्पवयीन मुलीने अपल्या आजीच्या मोबाईलवरून एका अनोळखी क्रमांकावर तिचा नग्न फोटो पाठवला होता. हे आजिच्या लक्षात आल्यानंतर, त्यांनी यासंदर्भात लगेचच तिच्या आई-वडिलांना याची माहिती दिली. यानंतर, पीडितेच्या आईने यासंदर्भात तिच्याकडे विचारणा केली असता, कोचने अतिरिक्त प्रशिक्षण देण्याच्या बहाण्याने अनेकवेळा आपले लैंगिक शोषण केले, तसेच यासंदर्भात कुणालाही काहीही न सांगण्याची धमकी दिल्याचे तिने आईला सांगितले.

घरातही केला लैंगिक अत्याचार -
यानंतर, पीडितेच्या आईने पोलिसांत तक्रार दाखल केली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, यात पीडितेच्या आईने म्हटले आहे की, गेल्या दोन वर्षांपूर्वी, त्यांच्या मुलीने एका स्पोर्ट्स सेंटरमध्ये बॅडमिंटन कोचिंगसाठी प्रवेश घेतला होता. येथे कोचने तिच्यावर अनेकवेळा लैंगिक अत्याचार केले. त्याने तिला घरीही नेले होते आणि तेथेही तिच्यावर लैंगिक अत्याचार केले.

तामिळनाडूतीन रहिवासी आहे कोच -
पीडितेच्या आईने आपल्या तक्रारीत म्हटले आहे की, "10वीची परीक्षा दिल्यानंतर आपली मुलगी आजीच्या घरी गेली होती. तिने 30 मार्चला तिच्या बॅडमिंटन कोचच्या म्हणण्यावरून काही नग्न फोटो पाठवले होते." यासंदर्भात एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, संबंधित कोच विरुद्ध पोक्सो अॅक्ट अंतर्गत गुन्हा दाखल करून त्याला गुरुवारी अटक करण्यात आलीआहे. 

इतरही काही मुलींचे फोटो सापडले - 
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने गुन्हा कबूल केला आहे. चौकशीत त्याच्या मोबाईलमध्ये संबंधित मुलीच्या नग्न फोटोसह इतरही मुलींचे नग्न फोटो सापडले आहेत.

Web Title: Badminton coach asked for nude photo, she sent it from grandmother's mobile now Shocking revelation during investigation coach arrested

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.