शहरं
Join us  
Trending Stories
1
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
2
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
3
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
4
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
5
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
6
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
7
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
8
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
9
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
10
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
11
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
12
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
13
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
14
अबतक ४००! चेपॉकच्या घरच्या मैदानात MS धोनीच्या नावे झाला खास रेकॉर्ड
15
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
16
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...
17
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
18
Video - अरे देवा! तिकीट भलतंच पण अरेरावी भरपूर; ट्रेनमध्ये टीटीईशी भिडली महिला अन्...
19
खिशातच आयफोनचा स्फोट, तरूण गंभीर जखमी; थरारक घटनेचा व्हिडीओ समोर
20
महात्मा गांधीही इंग्रजांना पत्र लिहिताना "आपला विश्वासू सेवक" लिहायचे, मग त्यांनाही...; राहुल गांधींची सुप्रीम कोर्टाकडून कानउघाडणी

भयंकर! भगतसिंगांची भूमिका साकारत होता चिमुकला; फाशीची तालीम सुरू असतानाच...; 'ती' चूक ठरली जीवघेणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 31, 2021 12:56 IST

10 year old shivam dead to hang while playing bhagat singh rehearsal for 15 august : 10 वर्षांचा मुलगा देशभक्तीपर कार्यक्रमात शहीद भगतसिंग यांची भूमिका साकारणार होता. यासाठी तो तालीम करत होता.

नवी दिल्ली - उत्तर प्रदेशच्या बदायूमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. 15 ऑगस्ट रोजी देशभक्तीपर कार्यक्रमासाठी सराव करणाऱ्या मुलाचा तालमीदरम्यान मृत्यू झाला आहे. 10 वर्षांचा मुलगा देशभक्तीपर कार्यक्रमात शहीद भगतसिंग यांची भूमिका साकारणार होता. यासाठी तो तालीम करत होता. मात्र तालमीदरम्यान फाशीचा फास अचानक त्याच्या गळ्याभोवती घट्ट बसला आणि त्यामुळे त्याचा मृत्यू झाला. मिळालेल्या माहितीनुसार, 10 वर्षीय शिवम भगतसिंग यांची भूमिका करत होता. 

शिवम फाशीच्या भागाची तालीम करण्यासाठी स्टूलवर चढला होता. त्याने गळ्याभोवती फास घातल्याबरोबर अचानक खाली ठेवलेल्या स्टूलवरून तो घसरला. ज्यामुळे त्याच्या गळ्याभोवती फास घट्ट झाला. त्यावेळी तिथे असलेली मुले त्याला मदत करू शकली नाहीत. दरम्यान या घटनेत शिवमचा मृत्यू झाला. तर, मुलाच्या कुटुंबीयांकडून ही घटना अपघात असल्याचे सांगत त्यांनी कोणाविरोधात तक्रार केलेली नाही. शिवमच्या कुटुंबाने कोणतीही कायदेशीर कारवाई न करता मुलावर अंत्यसंस्कार केले. 

परिसरात या घटनेने एकच खळबळ उडाली आहे, शिवमच्या कुटुंबीयांनी अपघातामुळे ही घटना घडल्याने कोणालाही दोष देता येत नाही असं म्हटलं आहे. गुरुवारी दुपारी 10 वर्षीय शिवम काही मुलांसोबत खेळत होता. त्याच्यासोबत गावातील प्राथमिक शाळेतील मुलेदेखील होती. या सर्व मुलांनी 15 ऑगस्टसाठी नाटकाचा सराव सुरू केला. शिवमने यामध्ये भगतसिंग यांची भूमिका साकरली होती. शिवमने खाटेवर चढून फाशीचा दोर वर बांधला. त्याने मुलांना सांगितले की मी भगतसिंग यांच्यासारखा फासावर लटकेल. 

शिवमने गळ्यात दोर घालताच अचानक त्याच्या पायाखालून स्टूल सरकला आणि त्याच्या गळ्याभोवती फास बसला ज्यामुळे त्याचा जीव गुदमरला. तिथल्या मुलांना त्यावेळी काहीच समजले नाही. शिवम पाहून तिथे असलेल्या मुलांनी जोरजोरात आवाज केला आजूबाजूचे लोक घटनास्थळी पोहोचले यानंतर शिवमच्या पालकांना तेथे बोलावून संपूर्ण प्रकरण सांगण्यात आला. यामध्ये शिवमचा मृत्यू झाला असून सर्वांनाच मोठा धक्का बसला आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

टॅग्स :Uttar Pradeshउत्तर प्रदेशBhagat SinghभगतसिंगIndiaभारतCrime Newsगुन्हेगारीDeathमृत्यू