उत्तर प्रदेश हादरलं! अयोध्येत 4 वर्षांच्या चिमुकलीवर बलात्कार, परिसरात खळबळ
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 5, 2021 19:19 IST2021-04-05T19:18:34+5:302021-04-05T19:19:47+5:30
Crime News : मुलीची प्रकृती गंभीर असून तिला उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

उत्तर प्रदेश हादरलं! अयोध्येत 4 वर्षांच्या चिमुकलीवर बलात्कार, परिसरात खळबळ
अयोध्या - देशात अनेक धक्कादायक घटना समोर येत आहेत. याच दरम्यान उत्तर प्रदेश एका भयंकर घटनेने पुन्हा एकदा हादरलं आहे. अयोध्येत 4 वर्षांच्या चिमुकलीवर बलात्कार झाल्याची संतापजनक घटना घडली आहे. या घटनेने परिसरात खळबळ निर्माण झाली आहे. उत्तर प्रदेशच्या अयोध्या जिल्ह्यातील रुदौली परिसरातील एका गावात चार वर्षांच्या मुलीवर बलात्कार झाल्याची घटना उघडकीस आली आहे. गावातील तरुणानेच हे कृत्य केलं आहे. मुलीची प्रकृती गंभीर असून तिला उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
पोलिसांनी पीडितेच्या आईने दिलेल्या तक्रारीवरून आरोपीविरोधात गुन्हा दाखल केला आहे. आरोपीला अटक करण्यात आली आहे. पीडितेच्या आईने दिलेल्या तक्रारीनुसार, चार वर्षांची मुलगी संध्याकाळी उशिरापर्यंत घरासमोर खेळत होती. घटना घडली त्यावेळी आम्ही शेतावर गेलो होतो. त्यावेळी गावातील तरुण मुलीला घेऊन गेला. गावाबाहेरील ओढ्याच्या दिशेने नेले. तिथे तिच्यावर अत्याचार केले असं मुलीच्या आईने तक्रारीत म्हटलं आहे.
संतापजनक! बलात्काराच्या घटनेने परिसरात खळबळ, एकाला अटकhttps://t.co/iFenzygvRn#crime#crimenews#Rape#Police
— Lokmat (@MiLOKMAT) March 25, 2021
मुलगी अचानक बेपत्ता झाल्याने गावात खळबळ उडाली. कुटुंबीयांसह गावातील लोकही त्या मुलीचा शोध घेत होते. गावाजवळील ओढ्याजवळ मुलगी रडत बसली होती. तिची प्रकृती बिघडली होती. कुटुंबीयांनी पोलिसांना याबाबत माहिती दिली. रुदौली पोलीस ठाण्याचे प्रमुख राकेश श्रीवास्तव यांनी पीडितेच्या आईने आरोपीविरोधात तक्रार दाखल केली. पोलिसांनी तरुणाविरोधात गुन्हा दाखल केला आहे. त्याला अटकही केली आहे अशी माहिती दिली आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
धक्कादायक! लग्नाचं आमिष दाखवून केला बलात्कार, महिला कार्यकर्तीने पोलिसांत केली तक्रारhttps://t.co/GJW2K2Ysbd#crime#crimesnews#Congress#Rape#Policepic.twitter.com/WO04C2tX84
— Lokmat (@MiLOKMAT) April 3, 2021
"काँग्रेस आमदाराच्या मुलाने बलात्कार केला, जीवे मारण्याची दिली धमकी", महिला कार्यकर्तीचा गंभीर आरोप
मध्य प्रदेशातील उज्जैन जिल्ह्यात एक धक्कादायक घटना घडली आहे. काँग्रेस आमदाराच्या मुलाविरुद्ध बलात्काराची तक्रार दाखल करण्यात आली आहे. तसेच आमदाराच्या मुलाने जीवे मारण्याची देखील धमकी दिल्याचा गंभीर आरोप युवा काँग्रेसच्या एका महिला कार्यकर्तीने केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, बडनगर भागातील काँग्रेसचे आमदार मुरली मोरवाल यांचा मुलगा करण मोरवाल याच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. करणने लग्नाचं आमिष दाखवत फेब्रुवारी महिन्यात बलात्कार केल्याचा आरोप महिलेने केला आहे.
स्टेशन प्रभारी ज्योती शर्मा यांनी पीडितेच्या जबाबाच्या आधारे गुन्हा दाखल केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, तरुणीने गेल्या वर्षी करणशी ओळख झाली होती. त्यानंतर काही महिन्यांआधी तो तरुणीला एका हॉटेलमध्ये घेऊन गेला. त्याने बलात्कार केला तसेच कोणाला काही सांगितल्यास किंवा पोलिसांत तक्रार केल्यास जीवे मारण्याची धमकी देखील दिली असा आरोप पीडित तरुणीने केला आहे. तसेच याची एक ऑडिओ क्लिप असल्याचं देखील तिने म्हटलं आहे.
खळबळजनक! निवडणूक प्रचारावरून परतत असताना झाडल्या गोळ्या, हत्येच्या वाढत्या घटनांमुळे दहशतीचे वातावरणhttps://t.co/LzZ7kYKfMg#crime#CrimeNews#BJP#Murder#Police
— Lokmat (@MiLOKMAT) April 3, 2021