भयंकर! गुप्तांगात टाकली मिरची, दोन महिलांमधील भांडण पोहोचले टोकाला; व्हिडीओ व्हायरल
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 24, 2022 19:39 IST2022-02-24T19:38:31+5:302022-02-24T19:39:34+5:30
Chili put in private part : यादरम्यान त्यांच्यात काही गोष्टीवरून वाद झाला आणि त्यानंतर २ महिलांनी तिला मारहाण केली.

भयंकर! गुप्तांगात टाकली मिरची, दोन महिलांमधील भांडण पोहोचले टोकाला; व्हिडीओ व्हायरल
बाडमेर: बाडमेर जिल्ह्यातील सिणधरी पोलीस स्टेशन हद्दीतील कमठाई गावात दोन महिला एका महिलेला मारहाण करत असून तिच्या गुप्तांगामध्ये मिरची टाकत असल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
त्यानंतर पोलीस अधीक्षक दीपक भार्गव यांनी हे प्रकरण गांभीर्याने घेत सिणधरी पोलीस ठाण्याला कडक कारवाई करण्याच्या सूचना दिल्या, त्यावरून सिणधरी पोलीस ठाण्याने २ महिलांना ताब्यात घेतले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ओकतीय चवा येथील रहिवासी महिला कमठाई गावातील नातेवाईकांकडे गेली होती.
यादरम्यान त्यांच्यात काही गोष्टीवरून वाद झाला आणि त्यानंतर २ महिलांनी तिला मारहाण केली. तिच्या गुप्तांगामध्ये मिरची टाकली. तसेच या संपूर्ण घटनेचा व्हिडिओ बनवून तो सोशल मीडियावर व्हायरलही केला. व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये पीडित महिला सतत दोन्ही महिलांना तेथून निघून जाण्याची विनंती करत आहे, मात्र दोन्ही महिलांनी हा संपूर्ण प्रकार अत्यंत क्रूरपणे घडवून आणला.
सध्या सिणधरी पोलीस ठाण्याने दोन महिलांना ताब्यात घेऊन या संपूर्ण प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. त्याचबरोबर पोलिसांकडून पीडितेची वैद्यकीय तपासणी करण्यात येत आहे.