शहरं
Join us  
Trending Stories
1
एक दिवस फॅन्स अन् क्रिकेटपटू यांच्यातल्या विश्वासाला तडा जाईल, Rohit Sharma चं विधान
2
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
3
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
4
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
5
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
6
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
7
PM Modi vs Congress: "काँग्रेस म्हणजे भ्रष्टाचाराची जननी, त्यांना विकासाची ABCD माहिती नाही"; पंतप्रधान मोदी विरोधकांवर बरसले!
8
राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांच्या सभेत गोंधळ; बॅरिकेड्स तोडल्यामुळे चेंगराचेंगरी
9
RCB चे अभिनंदन न करता MS Dhoni ड्रेसिंग रुममध्ये का परतला? समोर आलं कारण 
10
पंजाब किंग्सची जोरदार फटकेबाजी, सनरायझर्स हैदराबादसमोर दोनशेपार लक्ष्य
11
Video:'भारतीय लहेजाची लाज वाटते?'; Cannes च्या रेड कार्पेटवर इंग्रजी बोलण्याने कियारा ट्रोल
12
Swati Maliwal Case : दिल्ली पोलिसांनी मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानातून सीसीटीव्ही डीव्हीआर जप्त केला
13
श्रेयस अय्यर, इशान किशन यांना BCCI कडून सेकंड चान्स; घेतला गेला मोठा निर्णय 
14
यावेळीही ट्रॉफी जिंकण्याचे RCB चे स्वप्न भंगणार? एक योगायोग अन् चाहत्यांचे टेन्शन वाढले
15
तुमको मिरची लगी तो मैं क्या करू? ठाण्यासाठी ‘करो या मरो’च्या लढाईला सिद्ध व्हा - देवेंद्र फडणवीस 
16
१% ते १००% पर्यंतचा प्रवास! RCB ची गाडी सुस्साट; ५ खेळाडूंमुळे मिळाले प्ले ऑफचे तिकीट
17
नातू प्रज्वल रेवण्णावरील आरोपांवर माजी पंतप्रधान देवेगौडा यांनी मौन सोडले; म्हणाले, दोषी आढळला तर...
18
नॅचरल आईस्क्रीमचे संस्थापक रघुनंदन श्रीनिवास कामथ यांचे निधन; वयाच्या ७० व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास 
19
ते कुणालाच नको होते; एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदाबाबत संजय राऊत यांचा नवा दावा
20
MS Dhoniचा मैदानाबाहेर मारलेला षटकार ठरला CSKच्या पराभवाचे कारण? RCBला मॅच जिंकण्यासाठी झाली मदत

अविनाश भोसलेंना ५ जुलैपर्यंत ईडी कोठडी

By ऑनलाइन लोकमत | Published: June 29, 2022 12:01 PM

ईडीच्यावतीने ऍड. हितेन वेणेगावकर यांनी न्या. एम. जी. देशपांडे यांना सांगितले की, येस बँकेने डीएचएफएलला ३,९८३ कोटी रुपयांचे कर्ज वितरित केले.

मुंबई : पुण्याचे प्रसिद्ध विकासक व एबीआयएल समूहाचे अध्यक्ष अविनाश भोसले यांना विशेष पीएमएलए न्यायालयाने मंगळवारी ५ जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली. येस बँकेचे संस्थापक राणा कपूर आणि डीएचएफएलचे कपिल वधावन यांच्या भ्रष्टाचाराच्या प्रकरणात केंद्रीय अन्वेषण ब्युरो (सीबीआय) ने अटक केली आहे. त्यांना आर्थर रोड तुरुंगात ठेवण्यात आले. सोमवारीच विशेष सीबीआय न्यायालयाने ईडीला भोसले यांचा ताबा घेण्याची परवानगी दिली. त्यानंतर ईडीने त्यांचा ताबा घेऊन मंगळवारी त्यांना विशेष पीएमएलए न्यायालयात हजर केले.ईडीच्यावतीने ऍड. हितेन वेणेगावकर यांनी न्या. एम. जी. देशपांडे यांना सांगितले की, येस बँकेने डीएचएफएलला ३,९८३ कोटी रुपयांचे कर्ज वितरित केले. त्यानंतर डीएचएफएलने   संजय छाब्रिया (एक सहआरोपी) च्या रेडियस ग्रुपला २,३१७ कोटी रुपये वितरित केले.  मग छाब्रियाने अविनाश भोसले यांच्या मालकीच्या निबोध रियल्टीकडे २६७ कोटी रुपये हस्तांतरित केले. आणखी रक्कम पुढे कोणाकडे व कुठे गेली, याचा तपास करण्यासाठी आरोपीची चौकशी करण्याकरिता त्याच्या ताब्याची आवश्यकता आहे, असे ईडीने न्यायालयाला सांगितले.

ईडी ‘पुढील तपास सुरू आहे,’ असे म्हणते...-     भोसले यांच्यावतीने ॲड. विजय अग्रवाल यांनी ईडीच्या मागणीवर आक्षेप घेतला. -     तपास दीर्घ काळासाठी सुरू ठेवू शकत नाही, असे अग्रवाल यांनी म्हटले. -     दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यावर न्यायालयाने म्हटले की, ईडी नेहमीच ‘’पुढील तपास सुरू आहे,’’ असे म्हणते आणि याबाबत सर्वोच्च न्यायालयात याचिका प्रलंबित आहे. -     आता ईडीला आरोपीचा ताबा द्यायचा की नाही, हा प्रश्न आहे.’’ -     सदर प्रकरणातील सहआरोपी संजय छाब्रिया याची चौकशीदरम्यान २६७ कोटी रुपयांचा मागमूस तपास यंत्रणेला लागला, असे मला ठामपणे वाटते. -     ३९८३ कोटी रुपयांचा हा आर्थिक घोटाळा आहे, याकडे दुर्लक्ष करून जमणार नाही. -     त्यातील २६७ कोटी आरोपीकडे (भोसले) होते,’’ असे म्हणत न्यायालयाने ५ जुलैपर्यंत भोसले यांना ईडी कोठडी सुनावली. -     तसेच भोसले यांनी घरचे जेवण व औषधे मिळण्यासंबंधी केलेला अर्ज न्यायालयाने मान्य केला. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीEnforcement Directorateअंमलबजावणी संचालनालयYes Bankयेस बँक