आकुर्डीत वाहतूक पोलिसाला मारहाण
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 30, 2019 14:22 IST2019-08-30T14:21:34+5:302019-08-30T14:22:27+5:30
वाहतूक नियमन करीत असलेल्या पोलीस कर्मचाऱ्याशी रिक्षाचालकाने हुज्जत घातली....

आकुर्डीत वाहतूक पोलिसाला मारहाण
पिंपरी : वाहतूक नियमन करीत असलेल्या पोलीस कर्मचाऱ्याशी रिक्षाचालकाने हुज्जत घातली. तसेच शिवीगाळ करून हाताने मारहाण करून दुखापत केली. आकुर्डी येथे खंडोबा माळ चौकात गुुरवारी (दि. २९) रात्री पावणेआठच्या सुमारास हा प्रकार घडला. सरकारी कामात अडथळा आणला म्हणून याप्रकरणी निगडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीुनसार, याप्रकरणी लक्ष्मण छगन कोल्हे (वय ३१) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार रिक्षाचालकासह दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादी कोल्हे पोलीस कर्मचारी असून निगडी वाहतूक विभागात त्यांची नेमणूक करण्यात आली आहे.
कोल्हे आकुर्डीतील खंडोबा माळ चौकात गुरुवारी रात्री पावणेआठच्या सुमारास वाहतूक नियमन करीत होते. त्यावेळी आरोपी रिक्षाचालकाने त्यांच्याशी हुज्जत घातली. तसेच दुसऱ्या आरोपीशी संगनमत करून शिवीगाळ करून पोलीस कर्मचारी कोल्हे यांना हाताने मारहाण करून दुखापत केली. सरकारी कामात अडथळा निर्माण करून धाकाने परावृत्त करण्याचा प्रयत्न केला. निगडी पोलीस तपास करीत आहेत.