ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटूचा भाऊ अर्सलानची जेलमध्ये रवानगी, बनावट दहशतवादी हल्ल्याचा कट आखल्याप्रकरणी दोषी
By पूनम अपराज | Updated: November 5, 2020 20:54 IST2020-11-05T20:53:53+5:302020-11-05T20:54:40+5:30
Jailed : अर्सलानच्या जवळच्या मैत्रिणीशी कमर निजामुद्दिनच्या वाढत्या संपर्कामुळे अर्सलानच्या मनात द्वेष निर्माण झाला होता.

ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटूचा भाऊ अर्सलानची जेलमध्ये रवानगी, बनावट दहशतवादी हल्ल्याचा कट आखल्याप्रकरणी दोषी
सिडनी - ऑस्ट्रेलियाचा आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू उस्मान ख्वाजाचा मोठा भाऊ बनावट दहशतवादी हल्ल्याचा कट आखून सहकाऱ्याला अडकवल्याप्रकरणी गुरुवारी कारागृहात पाठवण्यात आले उस्मानचा भाऊ अर्सलान तारिक ख्वाजाने ऑगस्ट २०१८ मध्ये न्यू साऊथ वेल्स विद्यापीठातील सहकारी कामेर निजामुद्दिन याच्या वहीत खोट्या नोंदी केल्या होत्या असल्याचे कबूल केले आहे. अर्सलानच्या जवळच्या मैत्रिणीशी कमर निजामुद्दिनच्या वाढत्या संपर्कामुळे अर्सलानच्या मनात द्वेष निर्माण झाला होता.
त्यानंतर निजामुद्दिनला याप्रकरणी अटक करण्यात आली होती आणि माध्यमांनी त्याला चुकीच्या पद्धतीने दहशतवादी घोषित केले होते. त्याला चार आठवडे तुरुंगात ठेवण्यात आलं होतं. मात्र, नंतर पोलिसांच्या तपासात त्याला अडकवण्यात आले असल्याचे उघडकीस आले. न्यू साऊथ वेल्स जिल्हा न्यायालयाने न्यायमूर्ती रॉबर्ट वेबर यांनी ४० वर्षीय अर्सलान याला दोन वर्षे सहा महिन्यांच्या विनापॅरोलसह शिक्षा सुनावली आहे.
ख्वाजाने एका वहीत कमीत कमी २२ पानांवर नोंदी केल्या आणि या वह्या विद्यापीठाच्या कर्मचाऱ्यांकडे सुपूर्द केल्या. या वहीत तत्कालीन पंतप्रधान मॅल्कम टर्नबुल आणि गव्हर्नर जनरल यांच्यासोबत पोलीस ठाण्यांवर दहशतवादी हल्ला करण्याच्या नोंदी होत्या तसेच मेलबर्नमध्ये बॉक्सिंग डे कसोटी क्रिकेटची जागा आणि इतर ठिकाणी हल्ला करण्याची धमकी देण्यात आली होती. अर्सनालचा भाऊ उस्मानने ऑस्ट्रेलियासाठी ४४ कसोटी सामने, ४० एकदिवसीय सामने खेळले आहेत.