औरंगाबादमध्ये रेल्वे पटरीवर तरुणाचा शीर नसलेला मृतदेह आढळला; नातेवाईकांचा घातपाताचा संशय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 25, 2019 14:03 IST2019-12-25T13:56:15+5:302019-12-25T14:03:16+5:30
मृतदेहा शेजारी काही कागदपत्रे आणि हेअरबॅण्ड आढळून आले.

औरंगाबादमध्ये रेल्वे पटरीवर तरुणाचा शीर नसलेला मृतदेह आढळला; नातेवाईकांचा घातपाताचा संशय
औरंगाबाद : छावणी पुलाजवळील रेल्वे पटरीवर बुधवारी सकाळी २६ वर्षीय तरुणाचा शीर नसलेला मृतदेह संशयास्पद अवस्थेत आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. मृताचे नाव चंदू सुरेश जाधव असे असून तो गांधीनगर येथील रहिवासी असल्याची माहिती मिळाली आहे.
बुधवारी सकाळी रेल्वे कर्मचाऱ्यास छावणी पुलाजवळ एका तरुणाचे शीर नसलेला मृतदेह आढळून आला. छावणी पोलिसांना याची माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी जाऊन मृतदेह ताब्यात घेत शासकीय रुग्णालय घाटी येथे दाखल केला आहे. मृतदेह रेल्वे पटरीमध्ये आढळून आला असून त्याचे शीर गायब होते. मृतदेहा शेजारी काही कागदपत्रे आणि हेअरबॅण्ड आढळून आले.
दरम्यान, मृतदेह गांधी नगर येथील चंदू जाधव असल्याची माहिती मिळताच त्याच्या नातेवाईकांनी घाटी रुग्णालयात गर्दी केली. मृतदेह संशयास्पद अवस्थेत सापडला असल्याने नातेवाईकांनी ही आत्महत्या नसून घातपाताचा संशय व्यक्त केला आहे. याबाबत छावणी पोलीस अधिक तपास करत आहेत.