Aunty committed crime, shows porn video to sister's minor daughter | मावशीनेच केले दुष्कृत्य, बहिणीच्या अल्पवयीन मुलीला दाखविला पॉर्न व्हिडिओ

मावशीनेच केले दुष्कृत्य, बहिणीच्या अल्पवयीन मुलीला दाखविला पॉर्न व्हिडिओ

ठळक मुद्दे तिने व तिच्या मित्राने या मुलीला पॉर्न व्हिडिओ वारंवार दाखविला़ ही मुलगी ऑगस्टमध्ये आपल्या आईकडे आली़, तेव्हा तिने घडलेला हा सर्व प्रकार आईला सांगितला़.त्यानंतर पुढे आणखी एक धक्का कोंढवा पोलिसांना बसला़ त्यांची कोरोना चाचणी केल्यावर ते दोघेही पॉझिटिव्ह आढळून आल्याने पोलिसांची एकच धांदल उडाली़. 

पुणे : लॉकडाऊनच्या काळात आपल्या बहिणीच्या घरी मुलांना विश्वासाने ठेवल्याला जेव्हा आपल्या बहिणीचे कृत्य समजले़ तेव्हा आईला धक्कादायक बसला़ ‘माय मरो पण मावशी जगो’ या म्हणीलाच या बहिणीने काळीमा फासला होता़  आपल्या प्रियकरच्या मदतीने तिने आपल्या अल्पवयीन भाचीला पॉर्न व्हिडिओ वारंवार दाखविल्याचे समोर आले आहे़ कोंढवा पोलिसांनी तिच्या प्रियकरासह मावशीला अटक केली़. त्यानंतर पुढे आणखी एक धक्का कोंढवा पोलिसांना बसला़ त्यांची कोरोना चाचणी केल्यावर ते दोघेही पॉझिटिव्ह आढळून आल्याने पोलिसांची एकच धांदल उडाली़. 


कोंढवा येथील एका महिलेने लॉकडाऊनच्या काळात आपल्या ४ मुलांना लहान बहिणीकडे पाठविले होते़ ही बहिणी घटस्फोटीत असून सध्या एका मित्राबरोबर उंड्री येथे राहते़ एप्रिल, मे आणि जूनमध्ये ही मुले आपल्या मावशीकडे होती़ त्यावेळी ती १६ वर्षाच्या मुलीला तू मॉड दिसले पाहिजे. आम्ही पहा कसे राहतो, असे सांगत होती़. त्या दरम्यान तिने व तिच्या मित्राने या मुलीला पॉर्न व्हिडिओ वारंवार दाखविला़ ही मुलगी ऑगस्टमध्ये आपल्या आईकडे आली़, तेव्हा तिने घडलेला हा सर्व प्रकार आईला सांगितला़. आईने थेट कोंढवा पोलीस ठाणे गाठून फिर्याद दिली़ पोलिसांनी दोघांना अटक केली़. 


याबाबत वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनायक गायकवाड यांनी सांगितले की, आईच्या फिर्यादीनुसार पोलिसांनी दोघांना अटक केली़  त्यांच्याकडे तपास केल्यानंतर दोघांना न्यायालयीन कोठडी मंजूर करण्यात आली होती़ त्यांना कारागृहात पाठविण्यापूर्वी कोविड १९ ची चाचणी घेण्यात आली़ त्यात दोघेही पॉझिटिव्ह आढळून आले़ त्यामुळे त्यांना ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले़ तपासादरम्यान दोघांच्या संपर्कात आलेल्या पोलिसांची चाचणी घेण्यात आली आहे़. त्यात एक महिला कर्मचाºयांनाही संसर्ग झाल्याचे निष्पन्न झाले आहे़ इतर ५ जणांचे अहवाल अजून येणे बाकी आहे. 

Web Title: Aunty committed crime, shows porn video to sister's minor daughter

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.