औंध : पोलीस ठाण्याचे लॉकअप तोडून दरोडेखोर पळाले; पोलिसांनाही केली मारहाण

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 9, 2022 10:05 IST2022-05-09T08:59:37+5:302022-05-09T10:05:41+5:30

खटाव तालुक्यातील औंध पोलीस स्टेशनचे लॉकअप तोडून गंभीर गुन्ह्यातील संशयित आरोपींनी पळ ठोकला.

Aundh The robbers broke the lockup of the police station and fled they also beat up the police | औंध : पोलीस ठाण्याचे लॉकअप तोडून दरोडेखोर पळाले; पोलिसांनाही केली मारहाण

औंध : पोलीस ठाण्याचे लॉकअप तोडून दरोडेखोर पळाले; पोलिसांनाही केली मारहाण

औंध : खटाव तालुक्यातील औंध पोलीस स्टेशनचे लॉकअप तोडून गंभीर गुन्ह्यातील संशयित आरोपींनी पळ ठोकला. लॉकअपचे दार तोडल्यानंतर पाच दरोडेखोरांनी पोलीस ठाण्यातील पोलिसांना मारहाण केली असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. सचिन भोसले, राहुल भोसले, अजय भोसले, अविनाश भोसले, होमराज भोसले (सर्व रा. बीड व अहमदनगर जिल्हा) अशी संशयित आरोपींची नावे आहेत.

ही घटना सोमवारी पहाटे तीनच्या सुमारास घडली. यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. औंध पोलीस ठाण्याचे सर्व कर्मचारी, पोलीस पाटील शोध मोहिमेसाठी रवाना झाले असून संशयित आरोपी जवळच वरुड सिद्धेश्वर कुरोली परिसरात असल्याची मिळाली आहे.

संशयिताना गंभीर गुन्ह्यात अटक करण्यात आली होती. पोलीस कोठडीत असल्याने त्यांना लॉकअपमध्ये ठेवण्यात आले होते. पहाटे मात्र ताकदीच्या जोरावर दरोडेखोरांनी लॉकअप तोडून पळ ठोकला.

Web Title: Aundh The robbers broke the lockup of the police station and fled they also beat up the police