तलवारीचा धाक दाखवून प्रवाशाला लुटण्याचा प्रयत्न; फिल्मी स्टाईल प्रकार आला अंगलट 

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 1, 2021 13:55 IST2021-09-01T13:54:39+5:302021-09-01T13:55:16+5:30

Attempting to rob a passenger : कल्याण रेल्वे स्थानकातील घटना

Attempting to rob a passenger out of fear of the sword; The film style type got angled | तलवारीचा धाक दाखवून प्रवाशाला लुटण्याचा प्रयत्न; फिल्मी स्टाईल प्रकार आला अंगलट 

तलवारीचा धाक दाखवून प्रवाशाला लुटण्याचा प्रयत्न; फिल्मी स्टाईल प्रकार आला अंगलट 

ठळक मुद्देनिखिल वैरागर(२१) असे त्या आरोपीचे नाव असून त्याने या आधी किती प्रवाशांना अशा प्रकारे लुटले याचा शोध रेल्वे पोलीस घेत आहे.

डोंबिवली -  रात्री उशिरापर्यंत लोकलची वाट पाहत फलाटावर उभ्या असलेल्या प्रवाशाला थेट फिल्मी स्टाईल तलवारीचा धाक दाखवत लुटण्याचा प्रयत्न झाल्याची घटना कल्याणरेल्वे स्थानकात घडली. प्रवाशाने आरडाओरडा केल्याने फलाटावर तैनात असलेल्या रेल्वेपोलिस घटना स्थळीगेले आणि त्यानी अटक केली.


निखिल वैरागर(२१) असे त्या आरोपीचे नाव असून त्याने या आधी किती प्रवाशांना अशा प्रकारे लुटले याचा शोध रेल्वे पोलीस घेत आहे. वारंवार घडणाऱ्या अशा घटनामुळे प्रवाशाच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. आंबिवली येथे राहणारा एक तरुण हा २९ऑगस्ट रोजी ११ वाजण्याच्या सुमारास कल्याण रेल्वे स्थानकावर नंबर- २ फलाटावर पुलाच्या खाली लोकलची वाट बघत उभा होता. इतक्यात पुलावरून त्याच्या जवळ आलेल्या  वैरागर या तरुणाने त्याच्या शर्टच्या आत लपवून ठेवलेली तलवार काढली.


तलवारीचा धाक दाखवत जवळ असलेले पैसे आणि मोबाईल दे नाहीतर मारण्याची धमकी दिली. मात्र त्याच्या सुदैवाने लोकलच्या प्रतीक्षेत असलेला आणखी एक प्रवासी तलवार बघून पुढे सरसावला त्यांनी आरडा ओरड केल्याने ऑनड्युटीवर असलेल्या पोलिसांच लक्ष गेले. त्यांनी तत्काळ घटना स्थळी घेत निखील याला ताब्यात घेतलं कल्याण लोहमार्ग पोलीस ठाण्यात नेऊन  निखील विरोधात गुन्हा दाखल करत त्याला अटक केली. त्यास रेल्वे न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यास १५ दिवसांची जेल कोठडी सूनवल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक व्ही. डी. शार्दूल यांनी बुधवारी दिली.

Read in English

Web Title: Attempting to rob a passenger out of fear of the sword; The film style type got angled