कर्फ्युदरम्यान सामूहिक बलात्काराचा प्रयत्न; महिलेने आरोपीची दाताने जीभच तोडली
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 28, 2020 20:10 IST2020-03-28T20:04:45+5:302020-03-28T20:10:49+5:30
इतर आरोपीही जखमी अवस्थेत आपल्या साथीदाराला पाहून घटनास्थळावरून पळून गेले.

कर्फ्युदरम्यान सामूहिक बलात्काराचा प्रयत्न; महिलेने आरोपीची दाताने जीभच तोडली
जलपाईगुडी - कोलकत्यातील जलपाईगुडीच्या बाहेरच्या परिसरात जनता कर्फ्युच्या वेळी एका 65 वर्षीय महिलेवर सामूहिक बलात्काराचा प्रयत्न करण्यात आला. जनता कर्फ्यूदरम्यान काही लोकांनी जलपाईगुडीच्या निर्जन रस्त्यावर एका महिलेवर बलात्काराचा प्रयत्न केला, परंतु पीडित वृद्धेने धैर्याच्या जोरावर नराधमांचा डाव उधळला. महिलेने एका आरोपीची जीभ आपल्या दातांनी चावून कापून टाकली, त्यानंतर इतर आरोपीही जखमी अवस्थेत आपल्या साथीदाराला पाहून घटनास्थळावरून पळून गेले.
आजीबाईने खूप चांगले केले. आता डॉक्टरांनी देखील आरोपीची जीभ जोडण्यास अक्षम असल्याचे जाहीर केले आणि इतर आरोपींनाही पकडले पाहिजे आणि त्यांचे लिंग कापले पाहिजे होते अशी प्रतिक्रिया नागरिकांनी दिली.
मिळालेल्या माहितीनुसार, २२ मार्च रोजी जलपाईगुडीच्या पहाडपूर भागात राहणारी एक महिला आपल्या घरात एकटी होती. शहरातील जनता कर्फ्यूदरम्यान रस्त्यावर शांतता होती. दरम्यान रॉकी मोहम्मद आणि छोटू मोहम्मद नावाच्या दोन व्यक्तींनी या महिलेच्या घरात घुसून बलात्काराचा प्रयत्न केला. दरम्यान, या महिलेने आरोपी रॉकी मोहम्मदच्या जीभेचे लचके तोडले.
एक साथीदार निसटला
त्याची जीभ चावल्यानंतर आरोपीने घटनास्थळावरून पळ काढण्याचा प्रयत्न केला पण त्याआधीच महिलेने त्याला पकडले. त्याचवेळी छोटू मोहम्मद घटनास्थळावरून पळून जाण्यात यशस्वी झाला. या घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि रॉकी मोहम्मदला जलपाईगुडीच्या जिल्हा रुग्णालयात नेले.
पोलिसांना अद्याप एफआयआर मिळालेला नाही
रुग्णालयाच्या डॉक्टरांनीही रॉकीची जीभ परत जोडण्यास असमर्थता दर्शविली. मात्र, पोलिसांनी त्यांना रुग्णालयात दाखल केले आणि उपचार सुरू केले. आतापर्यंत यासंदर्भात पोलिसांत कोणतीही तक्रार दिली नसली तरी या प्रकरणाचा तपास सुरू असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे.