गिफ्ट डिलिव्हरीच्या बहाण्याने जाेगेश्वरीत डॉक्टरांच्या घरी चोरी करण्याचा प्रयत्न फसला, तिघांना अटक

By ऑनलाइन लोकमत | Published: April 17, 2021 06:42 AM2021-04-17T06:42:54+5:302021-04-17T06:43:14+5:30

Crime News :जोगेश्वरी पूर्वेतील सॅटेलाइट पार्क या सहकारी गृहनिर्माण संस्थेत गुरुवारी दुपारी दोनच्या सुमारास ‘गिफ्ट’ देण्याचा बहाणा करत दोघे तोंडाला कपडा बांधून आत शिरले.

Attempt to rob doctor's house in Jageshwari under the pretext of gift delivery foiled, three arrested | गिफ्ट डिलिव्हरीच्या बहाण्याने जाेगेश्वरीत डॉक्टरांच्या घरी चोरी करण्याचा प्रयत्न फसला, तिघांना अटक

गिफ्ट डिलिव्हरीच्या बहाण्याने जाेगेश्वरीत डॉक्टरांच्या घरी चोरी करण्याचा प्रयत्न फसला, तिघांना अटक

googlenewsNext

मुंबई : कडक निर्बंध असल्याने काेराेनाच्या ‘ब्रेक दि चेन’ला सहकार्य करुन नागरिक जीवनावश्यक वस्तू पार्सल मागवत आहेत. याचाच फायदा घेऊन चाेर डिलिव्हरी बॉयच्या वेशात इमारतीत प्रवेश करून लुबाडणूक करण्याची शक्यता नाकारता येत नाही. असाच एक फिल्मी थरार गुरुवारी जोगेश्वरीत घडला. चोरांनी गिफ्ट डिलिव्हरीच्या बहाण्याने सहाव्या मजल्यावर राहणाऱ्या डॉक्टरच्या पत्नीला जखमी केले. मात्र शेजाऱ्यांच्या प्रसंगावधानामुळे त्यांचा जीव वाचला व आरोपीही गजाआड झाले.
जोगेश्वरी पूर्वेतील सॅटेलाइट पार्क या सहकारी गृहनिर्माण संस्थेत गुरुवारी दुपारी दोनच्या सुमारास ‘गिफ्ट’ देण्याचा बहाणा करत दोघे तोंडाला कपडा बांधून आत शिरले. नेमके त्याचवेळी इमारतीचा सुरक्षारक्षक तिथे नसल्याने रजिस्टरमध्ये नोंद न करता ते थेट सी विंगमधील सहाव्या मजल्यावरील डॉक्टर राजेशकुमार यादव यांच्या फ्लॅटसमोर उभे राहिले. त्यावेळी घरात फक्त डॉक्टरांची पत्नी सुशीला (४१) होत्या. पार्सल दिल्यावर पावतीवर सही करायला सांगत अचानक या चोरट्यांनी त्यांना चाकूचा धाक दाखवला. वार चुकवण्यासाठी त्या जमिनीवर बसल्या व जोरजोरात ओरडू लागल्या. या प्रयत्नात त्यांच्या हाताला चाकू लागला व त्या जखमी झाल्या. मात्र त्याचवेळी शेजारी नागेश बुरला बाहेर आले. प्रसंगावधान राखत त्यांनी चाेरट्यांच्या हातातला चाकू हिसकावला आणि आरडाओरडा करून सुरक्षारक्षक, इतर रहिवाशांना गाेळा करण्याचा प्रयत्न केला. त्यादरम्यान दोन चोर घाबरून पार्किंगमधील छोट्या भिंतीवरून उड्या टाकून फाटकाबाहेर पळाले. त्यामागाेमाग तिसराही पळाला. बुरला यांच्यासह अन्य काही जणांनीही चाेरांचा पाठलाग केला. सुरक्षारक्षकाने सुमारे २०० मीटरपर्यंत पाठलाग करून एकाला पकडले. विक्रम यादव (३३) असे पकडलेल्या चाेराचे नाव आहे.

चोराच्या हातातला चाकू हिसकवला
मी चोरांच्या अंगावर धावत गेलो. त्यांच्या हातातील चाकू हिसकावला. त्यातील एकाने माझ्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला, मात्र माझ्यावर नियंत्रण मिळवता येणार नाही हे समजल्यावर तो पळाला. अखेर पाठलाग करून एकाला पकडण्यात आले. अन्य दाेघांनाही जोगेश्वरी पोलिसांनी अटक केली.
- नागेश बुरला, यादव यांचे शेजारी

डिलिव्हरी बॉयच्या वेशात येणाऱ्यांचा सुरक्षारक्षकांना संशय येत नाही. याचाच फायदा घेऊन चाेरट्यांनी ही योजना आखली असावी. त्यामुळे कडक निर्बंधांच्या काळात नागरिकांनी सावध रहावे.
- मेघना सामंत, यादव यांचे शेजारी

Web Title: Attempt to rob doctor's house in Jageshwari under the pretext of gift delivery foiled, three arrested

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.