ओमी कलानी टीमच्या पदाधिकाऱ्याची कार जाळण्याचा प्रयत्न

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 7, 2021 17:43 IST2021-01-07T17:41:50+5:302021-01-07T17:43:07+5:30

Crime News : याप्रकरणी उल्हासनगर पोलीस ठाण्यात दोघा विरोधात गुन्हा दाखल झाला आहे. 

Attempt to burn the car of Omi Kalani team office bearers | ओमी कलानी टीमच्या पदाधिकाऱ्याची कार जाळण्याचा प्रयत्न

ओमी कलानी टीमच्या पदाधिकाऱ्याची कार जाळण्याचा प्रयत्न

ठळक मुद्देउल्हासनगरातील ओमी कलानी टीमचे युवा कार्याध्यक्ष पंकज त्रिलोकांनी ओमी कलानी यांचे अत्यंत विश्वासू आहेत.

सदानंद नाईक


उल्हासनगर : ओमी कलानी टीमचे युवा कार्याध्यक्ष पंकज त्रिलोकांनी यांनी इमारती खाली पार्किंग केलेल्या कारवर पेट्रोलचे फुगे फेकून कार जाळण्याचा प्रयत्न झाला. याप्रकरणी उल्हासनगर पोलीस ठाण्यात दोघा विरोधात गुन्हा दाखल झाला आहे. 

उल्हासनगरातील ओमी कलानी टीमचे युवा कार्याध्यक्ष पंकज त्रिलोकांनी ओमी कलानी यांचे अत्यंत विश्वासू आहेत. तसेच ते विविध सामाजिक कार्यक्रम राबवित असल्याने त्यांच्या नावाची चर्चा शहरात आहे. ओमी टिमचा भावी नगरसेवक म्हणून त्यांची उमेदवारी निवडणुकीच्या एका वर्षांपूर्वीच ओमी कलानी यांनी घोषित केली. बुधवारी मध्यरात्री ३ वाजता पीपी किट्स घालून आलेल्या दोघांनी इमारती खाली पार्किंग केलेल्या कारवर पेट्रोलचे भरलेली फुगे फेकून मारून आग लावली. आगीत कार काही प्रमाणात जळाली असून याप्रकरणी उल्हासनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. पंकज त्रिलोकांनी यांची कार जाळण्याचा हा दोन वर्षातील दुसरा प्रकार आहे. एका वर्षांपूर्वी जाळलेल्या कार प्रकरणी गुन्हाही दाखल असूनही आरोपी पकडण्यात पोलिसांना अद्याप यश आले नाही, अशी माहिती त्रिलोकांनी यांनी दिली. 

कार जाळण्याचा प्रकाराने पंकज प्रचंड घाबरले आहेत. माझ्यासह परिवाराला मानसिक व शारिरीक छळ करण्याचा प्रकार असल्याचे पंकज त्रिलोकांनी यांनी सांगितले. पोलिसांनी बघाची भूमिका न घेता यामागील छेडा लावण्याची विनंती पंकज त्रिलोकांनी यांनी केला. ओमी कलानी यांनीही या प्रकारचा निषेध केला आहे

Web Title: Attempt to burn the car of Omi Kalani team office bearers