मंडळातून काढल्याच्या रागातून तरुणावर प्राणघातक हल्ला
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 4, 2019 15:56 IST2019-04-04T15:55:31+5:302019-04-04T15:56:19+5:30
मंडळातून काढल्याचा राग मनात धरुन तरुणाला लाकडी दांडक्याने बेदम मारहाण करत प्राणघातक हल्ला करण्यात आला..

मंडळातून काढल्याच्या रागातून तरुणावर प्राणघातक हल्ला
पिंपरी : मंडळातून काढल्याचा राग मनात धरुन तरुणाला लाकडी दांडक्याने बेदम मारहाण करत प्राणघातक हल्ला करण्यात आला. ही घटना मंगळवारी सायंकाळी साडेसातच्या सुमारास देहूरोड येथील एकता बॉईज चौकात घडली. याप्रकरणी देहूरोड पोलिसांनी एकाला अटक केली आहे .
अजय दिपक तुपे (रा. विकासनगर, देहूरोड) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी गणेश नागेश कुचीकर (वय २८, रा. शिवाजीनगर, दत्त मंदीराशेजारी, देहूरोड) यांनी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेली माहिती , फिर्यादी गणेश यांचा भाऊ शंकर यांनी मंडळातून काढल्याचा आरोपी तुपे याला राग होता. दरम्यान, शंकर तुपे हे मंगळवारी सायंकाळी साडेसातच्या सुमारास देहूरोड येथील एकता बॉईज चौकातून पायी जात असताना आरोपीने लाकडी दांडक्याने त्यांच्या डोक्यात मारहाण केली. या प्राणघातक हल्ल्यात ते गंभीर जखमी झाले. तसेच यावेळी त्याठिकाणी असलेल्या सिमा कप्तान बोथ या शंकर यांना सोडविण्यासाठी गेल्या असता आरोपीने त्यांना ढकलून दिले. त्यानंतर आरोपी तेथून पसार झाला. याप्रकरणी देहूरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असून अजय तुपे याला अटक केली आहे. पोलीस अधिक तपास करत आहेत.