क्रिकेट खेळण्यासाठी मैदानावर गेलेल्या तरुणावर प्राणघातक हल्ला 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 17, 2018 15:41 IST2018-12-17T15:40:39+5:302018-12-17T15:41:44+5:30

क्रिकेट खेळण्यासाठी मैदानावर गेलेल्या तरुणावर टोळक्याने प्राणघातक हल्ला केला.

attack on a young man who going playing cricket on ground | क्रिकेट खेळण्यासाठी मैदानावर गेलेल्या तरुणावर प्राणघातक हल्ला 

क्रिकेट खेळण्यासाठी मैदानावर गेलेल्या तरुणावर प्राणघातक हल्ला 

ठळक मुद्देचार जणांवर चिंचवड ठाण्यात गुन्हा दाखल

पिंपरी : क्रिकेट खेळण्यासाठी मैदानावर गेलेल्या तरुणावर टोळक्याने प्राणघातक हल्ला केला. ही घटना चिंचवड येथील मोरया गोसावी क्रीडांगण येथे रविवारी सायंकाळी चारच्या सुमारास घडली. अजय उर्फ बेडक्या कांबळे, जॉनी उर्फ आशितोष जगताप यासह त्यांच्या तीन साथीदारांवर चिंचवड ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी सिद्धार्थ शशिकांत शेलार (वय २५, रा. गांधीपेठ, चिंचवड) यांनी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेली माहिती अशी, सिद्धार्थ हे रविवारी दुपारी त्यांचे मित्र ओंकार चंद्रकांत भोईर (वय १९, रा. धिरज गॅलक्सी, भोईर आळी, चिंचवड) व बंटी वाल्हेकर (रा. वाल्हेकरवाडी, चिंचवड) यांच्यासमवेत मोरया गोसावी क्रीडांगणावर क्रिकेट खेळण्यासाठी गेले होते. दरम्यान, सायंकाळी चारच्या सुमारास आरोपी त्याठिकाणी आले. त्यांनी शेलारसह त्यांच्या मित्रांना लाथा बुक्क्यांनी व बांबुने मारहाण केली. तर अजय कांबळे याने शेलार यांच्या डोक्यात कोयत्याने वार केल्याने ते गंभीर जखमी झाले. त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. चिंचवड पोलीस अधिक तपास करीत आहेत. 

Web Title: attack on a young man who going playing cricket on ground