खाकीवर हल्ला! उल्हासनगरात पोलिसाला मारहाण, गुन्हा दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 26, 2020 16:03 IST2020-05-26T15:59:06+5:302020-05-26T16:03:02+5:30

याप्रकरणी मध्यवर्ती  पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून दोघांना पोलिसांनी अटक केली. 

Attack on Khaki! Police beaten up in Ulhasnagar pda | खाकीवर हल्ला! उल्हासनगरात पोलिसाला मारहाण, गुन्हा दाखल

खाकीवर हल्ला! उल्हासनगरात पोलिसाला मारहाण, गुन्हा दाखल

ठळक मुद्देउल्हासनगर कॅम्प नं-३ शिवाजी चौकात सोमवारी साडे सात वाजता पोलीस नाईक भाऊसाहेब शिंदे पेट्रोलिंग करीत होते. पोलिसांनी दोघांनाही ताब्यात घेतले असून मध्यवर्ती पोलीस ठाण्यात सरकारी कामात अडथळा व पोलिसाला मारहाण केल्याचा गुन्हा दाखल केला.

उल्हासनगर - पेट्रोलिंग करणाऱ्या पोलिसांनी विनाकारण फिरू नका असे हटकल्याचा राग  येऊन बाप लेकांनी पोलिसाला मारहाण केल्याची घटना सोमवारी रात्री साडे सात वाजता घडली. याप्रकरणी मध्यवर्ती  पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून दोघांना पोलिसांनी अटक केली. 


उल्हासनगर कॅम्प नं-३ शिवाजी चौकात सोमवारी साडे सात वाजता पोलीस नाईक भाऊसाहेब शिंदे पेट्रोलिंग करीत होते. त्यावेळी रस्त्याने पायी जाणाऱ्या दोघांना लॉकडाऊन दरम्यान चौकात थांबू नका. असे पोलिसांनी बजावले. याचा राग येऊन अशोक व पवन अरोरा पिता पुत्रांनी पोलीस नाईक शिंदे यांच्या सोबत हुज्जत घालून मारहाण केली. पोलिसांनी दोघांनाही ताब्यात घेतले असून मध्यवर्ती पोलीस ठाण्यात सरकारी कामात अडथळा व पोलिसाला मारहाण केल्याचा गुन्हा दाखल केला.

जंगलात नेऊन भावाने मित्रासह बहिणीवर केला सामूहिक बलात्कार अन् केली हत्या

 

लॉकडाऊनदरम्यान जप्त केलेली दारू विकली जात होत पोलीस ठाण्यात 

 

जम्मू-काश्मीरमध्ये IBने ताब्यात घेतले पाकिस्तानी 'गुप्तहेर' कबुतर

 

Web Title: Attack on Khaki! Police beaten up in Ulhasnagar pda