कट्टर हिंदू, परशुरामांचा वंशज...; अतिक अहमदची हत्या करणाऱ्या लवलेश तिवारीनं असा दिला आपला परिचय
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 20, 2023 14:54 IST2023-04-20T14:53:25+5:302023-04-20T14:54:01+5:30
अतिक अहमद आणि त्याच्या भावाची हत्या झाल्यानंतर, त्यांची हत्या करणाऱ्यांनी जय श्रीरामच्या घोषणाही दिल्या होत्या. प्राथमिक चौकशीनंतर, या तिघांनी प्रसिद्धिसाठी हे कृत्य केल्याचे पोलिसांनी म्हटले होते.

कट्टर हिंदू, परशुरामांचा वंशज...; अतिक अहमदची हत्या करणाऱ्या लवलेश तिवारीनं असा दिला आपला परिचय
उत्तर प्रदेशातील माफिया अतिक अहमद आणि त्याचा भाऊ अश्रफ यांची प्रयागराजमध्ये नुकतीच गोळ्या घालून हत्या करण्यात आली. या दोघांना मारल्यानंतर संबंधित तिन्ही शूटर्सनी स्वतःला पोलिसांच्या स्वाधीन केले. तेव्हापासून त्याची सातत्याने चौकशी सुरू आहे. माध्यमांतील वृत्तांनुसार, आतिकच्या मारेकऱ्यांपैकी एक लवलेश तिवारी याने आपला परिचय देताना स्वतःला कट्टर हिंदू आणि परशुरामांचा वंशज असल्याचे म्हटले आहे. अतिक अहमद आणि त्याच्या भावाची हत्या झाल्यानंतर, त्यांची हत्या करणाऱ्यांनी जय श्रीरामच्या घोषणाही दिल्या होत्या. प्राथमिक चौकशीनंतर, या तिघांनी प्रसिद्धिसाठी हे कृत्य केल्याचे पोलिसांनी म्हटले होते.
लवलेश तिवारी हा गँगस्टर अतिक अहमद आणि त्याचा भाऊ अश्रफ अहमदच्या हत्याकांडातील मुख्य आरोपी आहे. त्याच्या तीन मित्रांनाही उत्तर प्रदेशातील बांदा येथून पोलिसांच्या एसआयटीने ताब्यात घेतले आहे. या तिघांनाही बांदा रेल्वे स्थानकावर ताब्यात घेण्यात आले. पुलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पुढील तपासासाठी एसआयटीची टीम हमीरपूर आणि कासगंजलादेखील जाणार आहे.
या हत्येतील तिघांना अटक करण्यात आली आहे. अरुण मौर्य, सनी सिंग आणि लवलेश तिवारी, अशी या तिघांची नावं आहेत. या तिघांनीही आत्मसमर्पण केल्यानंतर त्यांना अटक करण्यात आली. त्याला पोलीस कोठडीत ठेवण्यात आले असून त्याची चौकशी करण्यात येत आहे. न्यायालयाने त्यांना 4 दिवसांची कोठडी सुनावली आहे.