ST कर्मचाऱ्यांच्या पैशांतून सदावर्तेंनी घेतल्या मालमत्ता! घरात सापडले नोटा मोजण्याचे मशीन; पोलिसांचा दावा

By ऑनलाइन लोकमत | Published: April 20, 2022 06:33 AM2022-04-20T06:33:14+5:302022-04-20T06:34:03+5:30

सदावर्ते सध्या सातारा पोलिसांच्या कोठडीत आहेत.  सरकारी वकील प्रदीप घरत यांनी मंगळवारी न्यायालयात अनेक गौप्यस्फोट करत सदावर्तेच्या कोठडीसाठी अर्ज केला. 

Assets taken by Sadavarten from ST bus employees' money! Note counting machine found in the house; Police claim | ST कर्मचाऱ्यांच्या पैशांतून सदावर्तेंनी घेतल्या मालमत्ता! घरात सापडले नोटा मोजण्याचे मशीन; पोलिसांचा दावा

ST कर्मचाऱ्यांच्या पैशांतून सदावर्तेंनी घेतल्या मालमत्ता! घरात सापडले नोटा मोजण्याचे मशीन; पोलिसांचा दावा

googlenewsNext

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या सिल्व्हर ओक निवासस्थानावरील हल्ल्याप्रकरणी अटकेत असलेले वकील गुणरत्न सदावर्ते यांनी एसटी कर्मचाऱ्यांकडून घेतलेल्या पैशांतून लाखोंची मालमत्ता खरेदी केल्याची धक्कादायक माहिती पोलीस तपासात पुढे आल्याचे सरकारी वकिलांनी मंगळवारी न्यायालयात सांगितले. सदावर्ते यांच्या कोठडीसाठी पोलिसांनी पुन्हा गिरगाव कोर्टात अर्ज केला आहे. त्यानुसार, गिरगाव कोर्टाने सदावर्ते यांना बुधवारी न्यायालयात हजर करण्याचे आदेश दिले आहेत.

सदावर्ते सध्या सातारा पोलिसांच्या कोठडीत आहेत.  सरकारी वकील प्रदीप घरत यांनी मंगळवारी न्यायालयात अनेक गौप्यस्फोट करत सदावर्तेच्या कोठडीसाठी अर्ज केला. 

आरोपीचे म्हणणे आहे की, मी वकील आहे; मात्र २० वर्षांपासून ते वकिली करत असताना, याच महिन्यात त्यांनी गाडी घेतली, याच काळात त्यांनी मालमत्ता कशा घेतल्या? त्यामुळे हे सर्व संशयास्पद आहे. याचा अधिक तपास करणे गरजेचे असल्याचे घरत यांनी सांगितले. याच मालमत्तेच्या चौकशीसाठी त्यांची पुन्हा कोठडी मागण्यात आल्याचे नमूद केले. तसेच सदावर्तेंच्या घरात सापडलेल्या डायरीतही काही संशयास्पद नोंदी आढळून आल्या असून, त्याचीही पडताळणी सुरू असल्याचे सांगितले. तसेच त्यांच्या घरातून ३५ महत्त्वाची कागदपत्रेदेखील जप्त केले असून, त्याचाही तपास सुरू असल्याचे सांगितले.

या सोबतच त्यांच्या घरातून पोलिसांनी नाेटा  मोजण्याचे मशीनदेखील जप्त केल्याचे सांगितल्याने सर्वांच्याच भुवया उंचावल्या. त्यांनी  ही मशीन कशासाठी  व कधी घेतली? याबाबत अधिक तपास करायचा असल्याचेही त्यांनी सांगितले. 

मोबाइलही गायब... -
- आरोपी सहकार्य करत असल्याचे आरोपींचे वकील सांगतात; मात्र अद्याप वापरत असलेला मोबाइल दिला नाही. 
- याच गायब असलेल्या 
मोबाइलमध्ये महत्त्वाची माहिती पोलिसांच्या हाती लागू शकते. त्यामुळे त्यांनी मोबाइल स्वतःहून द्यावा किंवा कुठे टाकला हे सांगावे, असेही प्रदीप घरत यांनी नमूद केले. 

कोल्हापूर पोलिसांनाही हवा आहे ताबा -
कोल्हापूर येथील एका प्रकरणात ताबा मिळावा म्हणून कोल्हापूर पोलिसांनीही गिरगाव कोर्टात दावा केला आहे. त्यामुळे येत्या काही दिवसात सदावर्ते यांच्या अडचणी आणखी वाढल्या आहेत. 

२५० डेपोंमधून पैसे केले गोळा -
सदावर्ते यांच्या घरात नोटा मोजण्याचे मशीन सापडले आहे. त्या मशीनमधून ८५ लाख रुपये मोजले गेल्याचे आढळले आहे. २५० डेपोंमधून पैसे गोळा गेल्याचीही माहिती समोर आल्याने या प्रकरणाला आणखी वेगळे वळण लागण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. 

कसे केले पैसे गोळा? -
प्रतिज्ञापत्राच्या नावाखाली सदावर्ते यांनी एक फॉर्म बनविला होता. त्याचे २५० रुपये आणि तिकीट फी ५० रुपये घेतले. हे पैसेदेखील लोकांना परत दिले नाही. यावेळी आरोपी संदीप गोडबोले यांच्या वकिलानेदेखील सदावर्ते यांची कोठडी द्यावी जेणेकरून तपास होईल, असे न्यायालयात सांगितले. 

२३ लाखांची कार खरेदी - 
- सदावर्ते यांनी एसटी कर्मचाऱ्यांकडून मिळालेल्या पैशांतून भायखळा, परळ येथे काही मालमत्ता खरेदी केल्याचे घरत यांनी सांगितले. तसेच, एक गाडीही घेतल्याचे नमूद केले. 
- केरळमधून १६ मार्चला २३ लाखांची गाडी खरेदी केली. मोहम्मद रफी नावाच्या व्यक्तीकडून ही कार खरेदी केली आहे. ओएलएक्सवर जाहिरात पाहून सदावर्ते यांनी संपर्क केला आणि आठवड्याभरातच ही कार खरेदी केली. 
- कारच्या खरेदीचे २३ लाख रुपये बँक खात्यात जमा केल्याचीही माहिती तपासात समोर आली आहे. 

- ६० लाखांची एक जागा सदावर्ते यांनी परळमध्ये खरेदी केली. भायखळा येथेही मालमत्ता खरेदी केली असल्याचे सरकारी वकिलांनी सांगितले. 

सदावर्ते पुन्हा हाजीर हो... -
गिरगाव कोर्टाने गुणरत्न सदावर्ते यांना बुधवारी कोर्टात हजर राहण्याचा आदेश दिला आहे. त्यामुळे सदावर्ते यावर काय माहिती देतात? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. 

Web Title: Assets taken by Sadavarten from ST bus employees' money! Note counting machine found in the house; Police claim

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.