दुचाकीवर स्क्रॅच पाडल्याचा जाब विचारल्याने सिमेंटच्या गट्टूने मारहाण 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 9, 2019 04:05 PM2019-04-09T16:05:51+5:302019-04-09T16:06:43+5:30

दुचाकीवर स्क्रॅच पाडल्याचा जाब विचारण्यासाठी गेलेल्या तरुणाला तिघांनी मिळून कपडे धुण्याच्या धोपटीने व सिमेंटच्या गट्टूने बेदम मारहाण केली.

assaulted by cement stone for a scratched bike | दुचाकीवर स्क्रॅच पाडल्याचा जाब विचारल्याने सिमेंटच्या गट्टूने मारहाण 

दुचाकीवर स्क्रॅच पाडल्याचा जाब विचारल्याने सिमेंटच्या गट्टूने मारहाण 

Next

पिंपरी : दुचाकीवर स्क्रॅच पाडल्याचा जाब विचारण्यासाठी गेलेल्या तरुणाला तिघांनी मिळून कपडे धुण्याच्या धोपटीने व सिमेंटच्या गट्टूने बेदम मारहाण केली. ही घटना थेरगाव येथील बालाजी कॉलनी येथे घडली.राजेंद्र लक्ष्मण डेंगळे (वय ४५),   करण राजेंद्र डेंगळे (वय २२), रोहित राजेंद्र डेंगळे (सर्व रा. बालाजी कॉलनी, थेरगाव) अशी गुन्हा दाखल केलेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी विठ्ठल तुळशीराम हनुमंते (वय २३, रा. बालाजी कॉलनी, थेरगाव) यांनी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेली माहिती अशी, फिर्यादी हनुमंते यांच्या दुचाकीला स्क्रॅच पडले होते. याबाबतचा जाब विचारण्यासाठी फिर्यादी हनुमंते हे डेंगळे कुटुंबियांकडे गेले. दरम्यान, याबाबतचा जाब विचारल्याच्या रागातून डेंगळे कुटुंबाच्या तिघांनी मिळून हनुमंते यांना हाताने मारहाण करीत जिवे मारण्याची धमकी दिली. यासह सिमेंटच्या गट्टुने व कपडे धुण्याच्या धोपटीने त्यांच्या कमरेवर व मानेवर मारहाण केली. यामध्ये ते जखमी झाले. याप्रकरणी वाकड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असून पोलीस अधिक तपास करीत आहेत.

Web Title: assaulted by cement stone for a scratched bike

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.