खोटी बिलं पास करण्यासाठी महिला अधिकाऱ्यावर दबाव; चिठ्ठीत वरिष्ठांची नावं लिहीत इंजिनिअरने स्वतःला संपवले

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 25, 2025 13:58 IST2025-07-25T13:58:21+5:302025-07-25T13:58:43+5:30

आसाममध्ये वरिष्ठांच्या जाचाला कंटाळून एका महिला सहाय्यक अभियंत्याने स्वतःला संपवले आहे.

Assam Senior officers used to put pressure to pass fake bills female engineer got upset and end his life | खोटी बिलं पास करण्यासाठी महिला अधिकाऱ्यावर दबाव; चिठ्ठीत वरिष्ठांची नावं लिहीत इंजिनिअरने स्वतःला संपवले

खोटी बिलं पास करण्यासाठी महिला अधिकाऱ्यावर दबाव; चिठ्ठीत वरिष्ठांची नावं लिहीत इंजिनिअरने स्वतःला संपवले

Assam PWD Engineer Suicide Case: आसामध्ये वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या त्रासाला कंटाळून एका ३० वर्षीय महिला कर्मचाऱ्याने आत्महत्या केली. मृत महिला कर्मचारी तिच्या घरी मृतावस्थेत आढळली होती. या महिलेने एक सुसाईड नोटही लिहीली होती ज्यात तिने दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांवर बनावट बिल मंजूर करण्यासाठी मानसिक दबाव आणल्याचा आरोप आहे. ती कामाच्या ठिकाणी प्रचंड मानसिक ताणतणावात होती आणि तिला वारंवार अपूर्ण कामासाठी बनावट बिले पास करण्यास भाग पाडलं जात होतं. या गंभीर प्रकरणाची दखल आसामचे मुख्यमंत्री हेमंता बिसवा शर्मा यांनी घेतली.

कनिष्ठ कर्मचाऱ्याच्या आत्महत्येप्रकरणी आसाम सरकारच्या सार्वजनिक बांधकाम विभागातील दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांना अटक करण्यात आली आहे. गुवाहाटी येथील रहिवासी आणि बोंगाईगाव येथे तैनात असलेल्या पीडब्ल्यूडीच्या महिला सहाय्यक अभियंत्या जोशिता दास मंगळवारी त्यांच्या भाड्याच्या घरामध्ये मृतावस्थेत आढळल्या. सुसाईड नोटमध्ये दास यांनी या दोन्ही वरिष्ठ अधिकाऱ्यांची नावे घेतली होती. पोलिसांनी दोघांनाही अटक केली असून एक पीडब्ल्यूडीचा कार्यकारी अभियंता आहे आणि दुसरा उपविभागीय अधिकारी आहे.  कामाचा फार ताण असल्याने मी हे पाऊल उचलत आहे. माझ्या कार्यालयात माझं मार्गदर्शन करण्यासाठी कोणीही नाही, मी फार थकलीय, कुठेही जाऊ शकत नाही, असं जोशिता दास यांनी म्हटलं होतं.

अटक केलेल्या दोन्ही अधिकाऱ्यांनी बोंगाईगाव येथे १२ कोटी रुपये खर्चाचे मिनी स्टेडियम बांधण्यासाठी त्याच्यावर खूप दबाव आणला. कंत्राटदाराने दिलेले महागडे बिल मंजूर करण्यासाठी त्यांनी  जोशितावर दबाव आणला होता. कागदपत्रांमध्ये गंभीर त्रुटी असतानाही बोरसोझगाव येथील मिनी स्टेडियम प्रकल्पासाठी कंत्राटदाराचे बिल मंजूर करण्यासाठी दोन्ही अधिकाऱ्यांनी दबाव आणला होता असं जोशिताने म्हटलं. कंत्राटदार रुद्र पाठक याने साईट इंजिनिअरची नियुक्ती केली नाही, ज्यामुळे जोशिताकडेच तांत्रिक जबाबदाऱ्या सोपवण्यात आल्या. वारंवार विनंती करूनही त्यांना कोणतीही मदत मिळाली नाही. वास्तुविशारद देबजीत शर्मा यांनी चुकांनी भरलेले टेडर सादर केले जे कोणतीही शाहनिशा न करता मान्य करण्यात आलं. 

दरम्यान, याच या महिन्यात दोन्ही अधिकाऱ्यांची बदली झाली होती. कार्यकारी अभियंत्याला नलबारी येथे बढती देण्यात आली, तर उपविभागीय अधिकाऱ्याची कामरूपी बदली करण्यात आली. गुवाहाटी येथून अटक करण्यात आलेल्या दिनेश शर्मा मेधी आणि अमीनुल इस्लाम या दोन्ही आरोपींना २३ जुलै रोजी बोंगाईगाव न्यायालयात हजर करण्यात आले.
 

Web Title: Assam Senior officers used to put pressure to pass fake bills female engineer got upset and end his life

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.