रायगडच्या पोलीस अधीक्षकपदी अशोक दुधे, ४ आयपीएस अधिकाऱ्याच्या बदल्या
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 7, 2020 20:38 IST2020-10-07T20:36:44+5:302020-10-07T20:38:36+5:30
Crime News : राज्य सेवेतील अप्पर अधीक्षक, उपअधीक्षक दर्जाचा अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या.

रायगडच्या पोलीस अधीक्षकपदी अशोक दुधे, ४ आयपीएस अधिकाऱ्याच्या बदल्या
मुंबई - रायगडच्या पोलीस अधीक्षकपदी अशोक दुधे यांची तर सातारा जिल्ह्याच्या प्रमुख पदी अजय कुमार बन्सल यांची निवड करण्यात आली आहे. दोघेजण नियुक्तीच्या प्रतीक्षेत होते, त्यांचासह चार आयपीएस अधिकाऱ्यांनच्या बुधवारी बदल्या करण्यात आल्या. तर राज्य सेवेतील अप्पर अधीक्षक, उपअधीक्षक दर्जाचा अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या.
* अधिकाऱ्याचे नाव , सध्याची पदस्थापना, बदलीनंतरची पदस्थापना :-
अशोक दुधे -प्रतिक्षाधीन- अधीक्षक राजगड, अजय कुमार बन्सल - प्रतीक्षाधीन- अधीक्षक सातारा, तेजस्वी सातपुते- सातारा- सोलापूर ग्रामिण
भरत तांगडे- राज्य गुप्त वार्ता- अधीक्षक, एसीबी, अमरावती,
डॉ. दिपाली धाटे - बदली आदेशाधीन- उपायुक्त ,सोलापूर शहर, सचिन हिरे - बदली आदेशाधीन- मोर्शी उपविभाग, अमरावती,
संतोष वाळके - बदली आदेशाधीन-उपविभागीय अधिकारी-बीड