Arrested two-wheeler robbery; MFC police has taken action | Video : दुचाकी चोरणारा सराईत गुन्हेगार अटकेत; एमएफसी पोलिसांची कारवाई
Video : दुचाकी चोरणारा सराईत गुन्हेगार अटकेत; एमएफसी पोलिसांची कारवाई

ठळक मुद्देसराईत चोरट्याला एमएफसी पोलिसांनी अटक केली आहे. आकाशकडून अजून काही दुचाकी आणि मोबाईल मिळण्याची शक्यता इतकेच नव्हे तर काही मोबाईल देखील आकाशने स्नेचिंग केले आहेत.

कल्याण - अवघ्या काही सेकंदात कोणतीही दुचाकी घेऊन पसार होणाऱ्या सराईत चोरट्याला एमएफसी पोलिसांनीअटक केली आहे. त्याच्याकडून चोरीच्या सहा दुचाकी हस्तगत केल्या आहेत.

कल्याणमधील हॉटेल, शोरूम, घरासमोर उभ्या असलेल्या दुचाकी चोरणाऱ्याचा सीसीटीव्ही पोलिसांच्या हाती लागला. त्याच्याआधारे एमएफसी पोलिसांनी या चोरट्याचा शोध सुरू केला. काही दिवसात शहाड परिसरात राहणाऱ्या  आकाश पारचे या चोरट्याला पोलिसांनी ताब्यात घेतले. त्याच्याकडे केलेल्या चौकशीत त्याने सहा दुचाकी चोरल्याची कबुली पोलिसांना दिली. इतकेच नव्हे तर काही मोबाईल देखील आकाशने स्नेचिंग केले आहेत. आकाशकडून अजून काही दुचाकी आणि मोबाईल मिळण्याची शक्यता असल्याची माहिती सहायक पोलिस आयुक्त अनिल पोवार यांनी दिली. काही सेकंदात आकाश कोणतीही दुचाकी मास्टर चावीच्या साहाय्याने चोरून पसार होत होता.


Web Title: Arrested two-wheeler robbery; MFC police has taken action
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.