चित्रा वाघ यांच्या विरोधात पोस्ट टाकणाऱ्यास अटक; मुंबई क्राईम ब्रॅंचची यवतमाळ जिल्ह्यात कारवाई 

By ऑनलाइन लोकमत | Published: March 6, 2021 10:00 PM2021-03-06T22:00:30+5:302021-03-06T22:01:03+5:30

सोशल मीडियावर अश्लील पोस्ट करून चित्रा वाघ यांची बदनामी केल्याचा आरोप या दोघांवर आहे.

Arrested for posting post against Chitra Wagh; Mumbai Crime Branch action in Yavatmal district | चित्रा वाघ यांच्या विरोधात पोस्ट टाकणाऱ्यास अटक; मुंबई क्राईम ब्रॅंचची यवतमाळ जिल्ह्यात कारवाई 

चित्रा वाघ यांच्या विरोधात पोस्ट टाकणाऱ्यास अटक; मुंबई क्राईम ब्रॅंचची यवतमाळ जिल्ह्यात कारवाई 

googlenewsNext

यवतमाळ : पुण्यातील तरुणीच्या आत्महत्येचा मुद्दा भाजप प्रदेश उपाध्यक्ष चित्रा वाघ यांनी लावून धरला. याच प्रकरणात सोशल मीडियावर त्यांच्याविरोधात अश्लील पोस्ट टाकण्यात आल्या. त्यांना फोनवर धमक्या देण्यात आल्या. या प्रकरणी मुंबई क्राईम ब्रॅंचच्या सायबर सेलने शुक्रवारी घाटंजी तालुक्यातील एकाला अटक केली.  तर दुसरा  पसार आहे. 

वाघ यांच्या तक्रारीवरून भादंवि कलम ३५४ (ड), ५०९, ५०६ आणि आयटी ॲक्टनुसार गुन्हा दाखल झाला आहे. यातील आरोपी राहुल तुळशीराम आडे रा. जरंग ता. घाटंजी याला मुंबई क्राईम ब्रॅंचचे पोलीस निरीक्षक प्रमोद कोठेकर यांनी अटक केली. तर पोलीस आल्याची कुणकुण लागताच संतोष राठोड रा. भांबोरा हा पसार झाला. थेट मुंबई क्राईम ब्रॅंचच्या सायबर सेलचे पथक यवतमाळात दाखल झाल्याने खळबळ उडाली होती. 

सोशल मीडियावर अश्लील पोस्ट करून चित्रा वाघ यांची बदनामी केल्याचा आरोप या दोघांवर आहे. त्याशिवाय त्यांनी फोनद्वारे धमकावल्याचाही ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे. यातील दुसरा पसार आरोपी यालाही लवकरच अटक करण्याची शक्यता पोलीस वर्तुळातून वर्तविली जात आहे.

Web Title: Arrested for posting post against Chitra Wagh; Mumbai Crime Branch action in Yavatmal district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.