शहरं
Join us  
Trending Stories
1
जनगणनेसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय, 11718 कोटी मंजूर; शेतकऱ्यांसाठीही खुशखबर!
2
IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांना क्लीन चीट ! महिला आयोगाचा अंतिम चौकशी अहवाल येणे बाकी
3
“मुंबईत येणार जगातील सर्वांत मोठा GCC प्रोजेक्ट, ४५ हजार रोजगार निर्माण होणार”: CM फडणवीस
4
"10 हजार द्या किंवा 1 लाख द्या, कुणीही मुस्लीम...!"; हिमंत बिस्वा सरमा यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
5
एक नंबर! WhatsApp युजर्ससाठी खुशखबर; कॉल न उचलल्यास पाठवा व्हॉइस किंवा व्हिडीओ नोट
6
रेल्वे अपघातांमध्ये विक्रमी घट! 'या' स्वदेशी तंत्रज्ञानामुळे सुरक्षेच्या दृष्टीने मोठं पाऊल
7
बीडमध्ये कोळवाडीजवळ थरार! भरधाव डिझेल टँकरने रस्त्यावर घेतला पेट; प्रवाशांमध्ये दहशत
8
मंगळ ग्रह गायब झाला तर पृथ्वीचं काय होणार? संशोधनातून धक्कादायक माहिती आली समोर  
9
"गुलामाने प्रतिक्रिया द्यायची नसते हे त्यांना सांगा"; अधिवेशनात उद्धव ठाकरेंचा एकनाथ शिंदेंवर घणाघात
10
विरोधी पक्षनेतेपदाबाबत उद्धव ठाकरे आक्रमक, सरकारची कोंडी करण्याची तयारी; स्पष्ट इशाराच दिला
11
“अधिवेशानाचे सत्ताधाऱ्यांना गांभीर्य नाही, ‘हम करे सो कायदा’ पद्धतीने…”: हर्षवर्धन सपकाळ
12
“संसदीय लोकशाहीत विविध पक्षांच्या संघटनेचे योगदान देखील महत्त्वाचे”: मंत्री चंद्रकांत पाटील
13
“बाबा आणि आत्याने आईला खूप मारलं'”; ढसाढसा रडत ४ वर्षांच्या लेकाचा धक्कादायक खुलासा
14
अक्षय खन्नाला आहेत दोन भाऊ, एक सख्खा अन् एक सावत्र, दोघांनीही बॉलिवूडमध्ये केलं काम
15
विराट कोहली, रोहित शर्माला कपिल देव यांचा अजब सल्ला, म्हणाले- "मला वाटतं की टीम इंडियात..."
16
कॅमेरा नसलेला 'आयफोन' बाजारात? खरेच असा फोन अस्तित्वात आहे का? ॲप्पलच बनविते...
17
या ठिकाणी अचानक पडले ७०० मोठे खड्डे, जमिनीत गाडला जातोय संपूर्ण परिसर, कारण काय?
18
“साधूसंत झाडावर राहणार का? एक दिवस लोक सरकारला ‘चले जाव’ म्हणतील”; अण्णा हजारे संतापले
19
मैत्रिणींचा सोनमला वाचवण्याचा प्रयत्न? राजा रघुवंशीच्या भावाचा खळबळजनक आरोप
20
टाटा-हिंडाल्कोसह 'या' शेअर्समध्ये बंपर तेजी! बाजारात सलग दुसऱ्या दिवशी गुंतवणूकदारांची चांदी
Daily Top 2Weekly Top 5

तरुणींना प्रेमात फसवून चोर्‍या करणार्‍यास अटक; बिबवेवाडीतील प्रकरणातील १ कोटी हस्तगत

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 13, 2020 20:41 IST

उच्च शिक्षित असल्याचे त्याच्या शिक्षणाचा फायदा घेऊन कोणताही पुरावा सापडणार नाही याची काळजी घेऊन तो स्वत:ला अटकेपासून वाचवित होता.

ठळक मुद्देत्याच्याकडून ९८ लाख १०हजार ५०० रुपये तसेच कार असा ऐवज जप्त

पुणे : श्रीमंत कुटुंबातील महिला, तरुणींना प्रेमात अडकवून त्यानंतर त्यांना बदनामीची धमकी देऊन चोर्‍या करणार्‍या अट्टल गुन्हेगाराला गुन्हेशाखेच्या युनिट ५ च्या पथकाने अटक केली. त्याने बिबवेवाडी येथील घरातून १ कोटी ७४ लाख रुपये चोरुन नेले होते.अनिकेत सुरेंद्र बुबणे (वय ३०, रा़ कृपा अपार्टमेंट, बालाजीनगर, धनकवडी) असे त्याचे नाव आहे. त्याचा हॉटेल व्यवसाय आहे.  त्याच्याकडून ९८ लाख १०हजार ५०० रुपये तसेच कार असा ऐवज जप्त करण्यात आला आहे.

बिबवेवाडी येथील एका घरातील महिलेस पूर्वीचे प्रेम प्रकरणाचा फायदा घेऊन तो १ वर्षापासून अब्रु नुकसानीची धमकी देऊन चोर्‍या करायला सांगत होता.तो उच्च शिक्षित असल्याचे त्याच्या शिक्षणाचा फायदा घेऊन कोणताही पुरावा सापडणार नाही याची काळजी घेऊन तो स्वत:ला अटकेपासून वाचवित होता.त्यामुळे त्याच्यापर्यंत पोहचण्यास पोलिसांना अनेक अडचणी येत होत्या. अनिकेत बुबणे याने बिबवेवाडीतील घरातून १ कोटी रुपये चोरल्यानंतर आपले जुने सर्व मोबाईल वापरणे बंद केले होते.

......................................

असा झाला तपास... गुन्हे शाखेच्या युनिट ५ कडील सहायक पोलीस निरीक्षक तासगांवकर, हवालदार राजेश रणसिंग यांनी तांत्रिक विश्लेषण करुन आरोपींच्या अनेक मैत्रिणीचा शोध घेऊन त्यांना विश्वासात घेतले. त्यांना अनिकेत बुबणे याचा खरा चेहरा समजावून सांगितला. त्याच गोष्टींचा फायदा झाला. अनिकेतने त्याच्या एका जुन्या मैत्रिणीला संपर्क केला. त्यावरुन पोलिसांना तो कोठे आहे, हे ठिकाण समजले. त्यावरुन वरिष्ठ पोलीस निरीक्षक दत्ता चव्हाण यांनी आरोपीला पकडण्यासाठी दोन पथके तयार केली. त्यांनी या मैत्रिणीमार्फत अनिकेतला बाणेर भागात भेटायला बोलावले. त्यानुसार अनिकेत शनिवारी दुपारी आपल्या कारमधून तेथे आल्यावर पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. त्याकडून ९८ लाख १० हजार ५०० रुपये हस्तगत केले असून कार इतर मुद्देमाल असा १ कोटी ८ लाख ३० हजार ५०० रुपयांचा ऐवज हस्तगत केला आहे.चौकशी दरम्यान, अनिकेत बुबणे याने डेटिंग वेबसाईटवर अनेक महिला व तरुणींशी मैत्री करुन, लग्नाचे आश्वासन देऊन त्यांची बदनामी करण्याची धमकी देऊन त्यांच्याकडून रोख रक्कम  किंवा दागिन्यांची चोरी करुन फसवणुककेली आहे. पिडित महिला व तरुणींनी त्याच्याविरुद्ध तक्रार करण्यासाठी पुढे यावे, असे आवाहन पोलिसांनी केले आहे़ही कामगिरी वरिष्ठ पोलीस निरीक्षक दत्ता चव्हाण, सहायक निरीक्षक संतोषतासगांवकर, उपनिरीक्षक सोमनाथ शेंडगे, तसेच प्रदीप सुर्वे, संतोष मोहिते, दत्ता काटम, प्रविण शिंदे, राजेश रणसिंग, अमजद पठाण, सचिन घोलप, महेशवाघमारे, प्रविण काळभोर, अश्रुबा मोराळे आदींनी केली.

टॅग्स :PuneपुणेfraudधोकेबाजीThiefचोरtheftचोरीArrestअटकPoliceपोलिस