घरफोड्या करणारा सराईत गुन्हेगार जेरबंद 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 14, 2019 18:40 IST2019-03-14T15:50:23+5:302019-03-14T18:40:08+5:30

तो सराईत गुन्हेगार असून आत्तापर्यंत तब्बल ५० घरफोड्या केल्या आहेत...

arrested person who break a home Around 50 | घरफोड्या करणारा सराईत गुन्हेगार जेरबंद 

घरफोड्या करणारा सराईत गुन्हेगार जेरबंद 

पिंपरी : पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या गुन्हे शाखा युनिट एकच्या पथकाने घरफोड्या करणाऱ्या सराईत गुन्हेगाराला जेरबंद केले असून त्याने ५ घरफोड्या केल्याचे उघडकीस आले आहे. 
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सराईत गुन्हेगार सुनील तलवारे (२८) हा वडगाव मावळ परिसरात भाड्याच्या खोलीत राहत असल्याची माहिती गुन्हे शाखा दोनच्या कर्मचाऱ्यांना मिळाली. त्यानुसार अधिकाऱ्यांनी तातडीने कारवाई केली असता तो राहत्या घरात पत्नी आणि मुलीसह आढळून आला. आरोपी सुनीलला पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले असता त्याने पिंपरी-चिंचवड परिसरातील वाकड, सांगवी आणि वडगाव मावळ येथे घरफोड्या केल्याचं समोर आले.
सुनील हा सराईत गुन्हेगार असून त्याने आत्तापर्यंत तब्बल ५ घरफोड्या केल्या आहेत. ही कारवाई वरिष्ठ पोलीस निरीक्षक भानुदास जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक सतीश कांबळे, पोलीस उपनिरीक्षक हर्षल कदम यांच्या पथकाने केली आहे.

Web Title: arrested person who break a home Around 50