शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
2
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
3
भर समुद्रात पाकच्या बोटीवरून ६०० कोटींचे ड्रग्ज जप्त; भारतीय तटरक्षक दल, एटीएस व एनसीबीची मोठी कारवाई
4
निवडणुकीत जातीपातीच्या जाणिवा टोकदार ; एकाच जातीचे उमेदवार; तिथे पाहतात पोटजात
5
ठाण्यातील ‘त्या’ सव्वातीन लाख मतांचे मालक कोण? अजित की शरद पवार?
6
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
7
साताऱ्यातील प्रचारात मुंबई बाजार समितीतील भ्रष्टाचाराचा मुद्दा ‘हॉट’ ; उदयनराजे भोसले आणि शशिकांत शिंदे यांच्यात थेट लढत
8
एक-एक वर्षासाठी पंतप्रधानपदाचे वाटप ; ‘इंडिया’चे हेच समीकरण : पंतप्रधान मोदी
9
भाजप अन् बीजेडीची ओडिशात मिलीभगत; निवडक लोकांसाठी काम : राहुल गांधी
10
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नेहमीच आरक्षणाचा समर्थक राहिला : मोहन भागवत
11
1 मे ध्वजारोहण : उमेदवार मंत्री वगळले, पण नातलग ?
12
मोटारीला चपलांचा हार आणि आरोप-प्रत्यारोपांचे प्रहार; जरांगे पाटलांनी केला आरोप
13
यापूर्वीही आरक्षणाला संघाचा विरोध : राहुल गांधी
14
तरुणाई का संतापली? निराश तरुण मतदानाकडेच पाठ फिरवताना दिसताहेत
15
निवडणूक आहे, जिभेला लगाम घाला !
16
दुबईत साकारतेय जगातील सर्वात मोठे विमानतळ; प्रथमच नवीन विमान वाहतूक तंत्रज्ञानाचा होणार वापर
17
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
18
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
19
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
20
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार

पैशाच्या व्यवहारावरून भांडण, मनात ठेवलेल्या रागातून एकाची हत्या 

By ऑनलाइन लोकमत | Published: November 19, 2020 9:21 PM

Murder : दोन आरोपींना पोलिसांनी केली अटक

ठळक मुद्दे या गुन्ह्यातील दोन्ही आरोपींना कामशेत पोलिसांनी मोठ्या शिताफीने दोन दिवसांत अटक केली आहे. याप्रकरणी वरीष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद डी चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सहा पोलीस निरीक्षक पी. पी. कदम हे करत आहेत.

कामशेत - पैसे देण्या घेण्याच्या कारणावरून झालेल्या वादाचा राग मनात ठेऊन दोघांनी १७ वर्षीय अल्पवयीन तरुणाचा खुन केल्याची धक्कादायक घटना कामशेत शहरात सोमवार (दि.१६) रात्री ७ वाजण्याच्या सुमारास घडली होती. या गुन्ह्यातील दोन्ही आरोपींना कामशेत पोलिसांनी मोठ्या शिताफीने दोन दिवसांत अटक केली आहे.याप्रकरणी कामशेत पोलीस नाईक वैभव सपकाळ यांनी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. समीर बाबू शेख (वय १७, रा. पंचशील कॉलनी, कामशेत) असे खुन झालेल्या तरुणाचे नाव आहे. साहिल सादिक शेख (वय २०, रा. सहारा कॉलनी, कामशेत), अल्ताफ लतिफ सय्यद (वय २०, रा. दत्त कॉलनी) अशी खुन केलेल्या आरोपींची नावे असुन आरोपींना कामशेत पोलिसांनी अटक केली आहे.कामशेत पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद चौधरी यांनी दिलेल्या माहितीनुसार, समीर शेख व यातील आरोपी साहिल शेख यांच्यात पैसे देण्या घेण्याच्या कारणावरून वादावादी झाली होती. आई वरून शिवीगाळ केल्याचा राग मनात ठेवत चिडून जाऊन यातील दोन्ही आरोपींनी संगनमताने समीर शेख यास सोमवारी ( दि. १६ ) रोजी मोटार सायकलवर बसवून कामशेत गावचे हद्दीतील जुना मुंबई पुणे महामार्गाच्या कामशेत खिंडी जवळ असलेल्या छत्री पॉईंट जवळील मुस्लिम दफन भुमीचे पाठीमागील डोंगराचे पायथ्याला वन विभागाचे जागेत नेले. आणि वस्तारा व सुरीने त्याच्यावर वार करून तसेच दगडाने डोक्यात मारून त्याचा खुन केला.हे दोन्ही आरोपी त्यानंतर फरार होते. कामशेत पोलिसांना बुधवारी आरोपी लोणावळा ग्रामीण येथे असल्याची गुप्त माहिती मिळाली. त्यानुसार लोणावळा ग्रामीण पोलिसांच्या मदतीने आणि मोठ्या शिताफीने या दोन्ही आरोपीना पकडण्यात आले. त्यांच्याकडे चौकशी करीत पोलिसी खाक्या दाखवल्या नंतर आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली. याप्रकरणी वरीष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद डी चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सहा पोलीस निरीक्षक पी. पी. कदम हे करत आहेत.

टॅग्स :MurderखूनPoliceपोलिसPuneपुणेlonavalaलोणावळा