तीन मद्यपी मित्रांमध्ये वाद झाला; चौथ्याने हवेत गोळीबार केला

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 17, 2021 12:02 IST2021-01-17T12:01:46+5:302021-01-17T12:02:15+5:30

Crime news: पोलिसांना घटनास्थळी दोन काडतुसे आढळून आली आहेत. लोणारी हॉल जवळील हुडको कॉलनी परिसरात चार तरुण मद्यपान करीत होते.

argument between three drunken friends; fourth fired bullet into the air in Bhusaval | तीन मद्यपी मित्रांमध्ये वाद झाला; चौथ्याने हवेत गोळीबार केला

तीन मद्यपी मित्रांमध्ये वाद झाला; चौथ्याने हवेत गोळीबार केला

भुसावळ : मद्यपान करणाऱ्या चार तरुणांमध्ये वाद होवून त्यापैकी एकाने हवेत गोळीबार केला. ही  घटना शनिवारी रात्री १० वाजता लोणारी मंगल कार्यालयानजीक घडली. यामुळे भुसावळ शहर पुन्हा एकदा हादरुन गेले. यात कुणालाही इजा झालेली नाही.


पोलिसांना घटनास्थळी दोन काडतुसे आढळून आली आहेत. लोणारी हॉल जवळील हुडको कॉलनी परिसरात चार तरुण मद्यपान करीत होते. त्यापैकी तीन जणांमध्ये वाद झाला. त्यावर चौथ्याने हवेत गोळीबार केला. गोळीबार होताच चारही जण तिथून पसार झाले. गोळीबाराचा आवाज होताच कॉलनीतील नागरिकांनी पोलिसांना कळविले.


   उपविभागीय पोलिस अधिकारी सोमनाथ वाघचौरे,  शहर पोलीस स्थानकाचे निरीक्षक बाबासाहेब ठोंबे बाजारपेठ पोलिस निरीक्षक दिलीप भागवत आदी घटनास्थळी पोहोचले. घटनास्थळी बंदुकीचे भरलेली एक गोळी  व एक रिकामी गोळी आढळून आली. 
यात  काही संशयितांना ताब्यात घेण्यात आले आहे.  गोळीबार करणारा तरुण आणि त्याच्या कुटुंबियांना देखील चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली.

Web Title: argument between three drunken friends; fourth fired bullet into the air in Bhusaval