बॅट तुटली म्हणूनचा वाद जीवावर बेतला; खुपसला पोटात चाकू

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 25, 2023 06:54 IST2023-04-25T06:54:04+5:302023-04-25T06:54:45+5:30

शहरातील रामदेवबाबा नगरात क्रिकेट खेळताना दोन अल्पवयीन मुलांमध्ये वाद झाला.

Argument because the bat is broken; Khusala knife in the stomach in buldhana | बॅट तुटली म्हणूनचा वाद जीवावर बेतला; खुपसला पोटात चाकू

बॅट तुटली म्हणूनचा वाद जीवावर बेतला; खुपसला पोटात चाकू

लोकमत न्यूज नेटवर्क  
मलकापूर (जि. बुलढाणा) : क्रिकेट खेळताना  बॅट तुटल्याने दोन अल्पवयीन मुलांत वाद झाल्याची घटना येथील रामदेवबाबा नगरात रविवारी सायंकाळी घडली. त्यात एकाने चक्क पोटात चाकू खुपसल्याने दुसऱ्याचा सोमवारी बुलढाण्यात उपचारादरम्यान मृत्यू झाला. पोलिसांनी विधिसंघर्षग्रस्त बालकास ताब्यात घेतले.   

शहरातील रामदेवबाबा नगरात क्रिकेट खेळताना दोन अल्पवयीन मुलांमध्ये वाद झाला. त्यात एकाची बॅट तुटली. त्यामुळे दोघांमध्ये चांगलीच हाणामारी झाली. त्यामध्ये विधिसंघर्षग्रस्त बालकाने घरातून आणलेला चाकू यश कैलास चव्हाण (१६) याच्या पोटात खुपसला. त्यामुळे यश गंभीर जखमी झाला. त्याला आधी स्थानिक दवाखान्यात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र, तब्येत खालावल्याने त्याला बुलढाणा येथे हलविण्यात आले. सोमवारी पहाटे पाचच्या सुमारास त्याचा मृत्यू झाला. पोलिसांनी तत्काळ या घटनेतील विधिसंघर्षग्रस्त बालकाला ताब्यात घेतले.

Web Title: Argument because the bat is broken; Khusala knife in the stomach in buldhana