तुम्ही जी औषधे घेता, ती बनावट आहेत का?; ब्रॅण्डेड नावासारखी औषधी स्वस्त दरात

By ऑनलाइन लोकमत | Published: May 6, 2023 11:55 AM2023-05-06T11:55:26+5:302023-05-06T12:15:17+5:30

हिमाचल, उत्तराखंडमध्ये बनवलेली बनावट औषधे महाराष्ट्रासह अनेक राज्यांमध्ये

Are the medicines you take counterfeit?; Brand name medicines at cheaper prices | तुम्ही जी औषधे घेता, ती बनावट आहेत का?; ब्रॅण्डेड नावासारखी औषधी स्वस्त दरात

तुम्ही जी औषधे घेता, ती बनावट आहेत का?; ब्रॅण्डेड नावासारखी औषधी स्वस्त दरात

googlenewsNext

राजेंद्र कुमार

लखनौ : मोठमोठे गुन्हेगार आणि माफियांवर अंकुश ठेवणाऱ्या योगी सरकारच्या कार्यकाळात मात्र बनावट औषधींचा व्यवसाय जोरात सुरू आहे. हिमाचल प्रदेश आणि इतर अनेक राज्यांत बनलेली बनावट औषधी उत्तर प्रदेशमार्गे मुंबई, पश्चिम बंगाल, ओडिशा, आंध्र प्रदेश आणि इतर अनेक राज्यांमध्ये पोहोचवली जात आहेत. हे नेटवर्क मोडून काढण्यासाठी पोलिांनी  मोहीम उघडली आहे.

नेमकी कोणती औषधे आहेत बनावट?
सुप्रसिद्ध कंपन्यांच्या ब्रँड नावासारखीच औषधी तयार करून उत्तर प्रदेशमार्गे विविध राज्यांमध्ये पाठवली जात आहेत. ब्रॅण्डेड औषधीच्या नावासारखी औषधी स्वस्त दरात विकली जात आहेत. जी ब्रॅण्डेड औषधी ८० रुपयांना मिळतात, तीच बनावट औषधी ३० ते ४० रुपयांना उपलब्ध करून दिली जात आहेत.

या बनावट औषधींच्या विक्रीत औषधी विक्रेते आणि मेडिकल व इंजिनिअरिंग ते इतर पदवीधारकांचा सहभाग आहे. विकल्या जाणाऱ्या बनावट औषधींपैकी बहुतांश कॅन्सरची औषधी आहेत. गर्भपात, फुप्फुस, संधिवात, रोगप्रतिकारशक्ती यासह विविध प्रकारच्या संसर्गाशी संबंधित बनावट औषधे विक्री करण्यात येत आहेत. आता २५ हून अधिक बनावट औषधींच्या विक्रीवर बंदी घातली आहे.

मोठा साठा जप्त
गेल्या काही महिन्यांत हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंडमध्ये तयार होणारी बनावट औषधी बिहार, ओडिशा, पश्चिम बंगाल आणि आंध्र प्रदेशच्या पोलिसांनी जप्त केला आहे.

Web Title: Are the medicines you take counterfeit?; Brand name medicines at cheaper prices

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :medicineऔषधं