वाधवान प्रकरणी अमिताभ गुप्ता यांच्या चौकशीसाठी 'या' अधिकाऱ्याची नेमणूक

By ऑनलाइन लोकमत | Published: April 10, 2020 05:28 PM2020-04-10T17:28:34+5:302020-04-10T17:33:12+5:30

गुप्ता यांना सक्तीच्या रजेवर पाठवल्यानंतर आता सरकार त्यांची चौकशी करणार असल्याचे देशमुख यावेळी म्हणाले.

Appointment of 'this' officer to investigate Amitabh Gupta in Wadhwan case pda | वाधवान प्रकरणी अमिताभ गुप्ता यांच्या चौकशीसाठी 'या' अधिकाऱ्याची नेमणूक

वाधवान प्रकरणी अमिताभ गुप्ता यांच्या चौकशीसाठी 'या' अधिकाऱ्याची नेमणूक

Next
ठळक मुद्देकोणत्याही आयपीएस अधिकाऱ्याला बडतर्फ करण्याचा अधिकार केंद्राला असल्याचे राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी स्पष्ट केले आहे.भा. दं. वि.  कलम १८८ अन्वये आणि कलम १४४ अंतर्गत याप्रकरणी हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.cr

मुंबई - लॉकडाऊन काळात महाराष्ट्र सरकारच्या गृह विभागाचे प्रधान सचिव अमिताभ गुप्ता यांनी परवानगी देऊन लॉकडाऊनचे उल्लंघन करत वाधवान यांना मदत केल्याप्रकरणी गुप्ता यांना सक्तीच्या रजेवर पाठविण्यात आले आहे. कोणत्याही आयपीएस अधिकाऱ्याला बडतर्फ करण्याचा अधिकार केंद्राला असल्याचे राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी स्पष्ट केले आहे. तसेच गृह मंत्रालयाचे विशेष प्रधान सचिव अमिताभ गुप्ता यांची अतिरिक्त मुख्य सचिव मनोज सैनिक चौकशी करणार असल्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. गुप्ता यांना सक्तीच्या रजेवर पाठवल्यानंतर आता सरकार त्यांची चौकशी करणार असल्याचे देशमुख यावेळी म्हणाले. 

 

कोरोनाचे भयंकर संकट वाढत असल्याने लॉकडाऊन तसेच संचारबंदी लागू असताना नियमांची पायमल्ली करत वाधवान कुटुंबियांनी मुंबई, खंडाळा ते महाबळेश्वर असा प्रवास केला. व्हीव्हीआयपी ट्रीटमेंट घेणाऱ्या दीवान हाउसिंग फायनान्स कॉर्पोरेशन लिमिटेडचे (डीएचएफएल) प्रवर्तक, त्यांचे कुटुंबीय आणि मित्रांवर महाबळेश्वर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भा. दं. वि.  कलम १८८ अन्वये आणि कलम १४४ अंतर्गत याप्रकरणी हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

वाधवान यांच्यावर आयपीसी १८८, २६९, २७०, ३४ त्याच बरोबर आपत्कालिन व्यवस्थानच्या कलम ५१ बी तसेच कोविड १९ च्या कलम ११ नुसार कारवाई करण्यात येणार असल्याचे देशमुख यांनी सांगितले. त्याचप्रमाणे डीएचएफएल कंपनी आणि येस बँक घोटाळा प्रकरणात जामिनावर असलेल्या बंधू धीरज वाधवान आणि कपिल वाधवान यांना कुटुंबाच्या आपत्कालीन परिस्थितीचे कारण सांगून खंडाळ्याहून महाबळेश्वरकडे जाण्यास परवानगी मिळाली होती. चौकशीत धक्कादायक बाब उघड झाली आहे. अशी कोणतीही आपत्कालीन परिस्थिती त्यांच्यापुढे निर्माण झालेली नव्हती. त्यामुळे संचारबंदीच्या कलम १४४चा भंग केला आहे. तसेच लॉकडाऊन काळात जाहीर करण्यात आलेले कलम १८८ चे उल्लंघन केले आहे. त्यामुळे त्यांच्यावर महाबळेश्वर पोलिसांनी वाधवान कुटुंबियांसह २३ जणांवर  गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Web Title: Appointment of 'this' officer to investigate Amitabh Gupta in Wadhwan case pda

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.