चोरांचा कारनामा! अवघ्या २० मिनिटांत २ कोटींच्या आयफोन आणि गॅझेट्सवर मारला डल्ला
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 6, 2024 15:45 IST2024-11-06T15:36:25+5:302024-11-06T15:45:29+5:30
बाईकवरून आलेल्या तीन चोरांनी अवघ्या २० मिनिटांत कोट्यवधींच्या गॅझेट्सची चोरी केली आहे.

चोरांचा कारनामा! अवघ्या २० मिनिटांत २ कोटींच्या आयफोन आणि गॅझेट्सवर मारला डल्ला
जयपूरमध्ये चोरांनी एका दुकानात घुसून आयफोनसह तब्बल दोन कोटी रुपयांचे गॅझेट पळवल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. बाईकवरून आलेल्या तीन चोरांनी अवघ्या २० मिनिटांत कोट्यवधींच्या गॅझेट्सची चोरी केली आहे. जवाहरनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका दुकानात पहाटे तीन ते चारच्या दरम्यान ही घटना घडल्याची माहिती मिळत आहे.
सकाळी दुकानाचे शटर तुटलेले पाहून आजूबाजूच्या लोकांनी दुकानदाराला चोरीच्या घटनेची माहिती दिली. माहिती मिळताच दुकानदार आणि पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी सीसीटीव्ही तपासले. ज्यामध्ये तीन तरुण चोरी करताना कॅमेऱ्यात कैद झाले आहेत. त्यानंतर पोलिसांनी एफएसएलला घटनास्थळी बोलावून पुरावे गोळा केले. चोरांचा शोध सुरू केला.
जयपुर में मोबाइल की दुकान से सवा करोड़ के apple मोबाइल चोरी
— Shyam Raj Sharma (@shyamraj08) November 6, 2024
चोर एप्पल ही खाते हैं pic.twitter.com/jI2CzueXY2
दुकानदार रविंद्र सिंह यांनी दिलेल्या माहितीनुसार, राजापार्कच्या पंचवटी सर्कलजवळ हॉट स्पॉट नावाचं त्यांचं दुकान आहे. दुपारी साडेतीनच्या सुमारास ही घटना घडली. सीसीटीव्हीमध्ये दिसत आहे की, तीन चोर बाईकवरून आले. यानंतर दुकानाचं शटर तोडून आत शिरले आणि दुकानात ठेवलेले २७२ ॲपल गॅझेट्स, मॅक बुक्स, टॅब, स्मार्ट वॉच व इतर वस्तू बॅगेत भरून पळ काढला.
दुकानदाराच्या म्हणण्यानुसार, चोरांनी २० मिनिटांत हा गुन्हा केला. चोरी करण्यासाठी आलेल्या दोन चोरांनी तोंडाला कपडा बांधला होता. घटनेचे गांभीर्य पाहून सांगानेरचे एसीपी विनोद कुमार हेही घटनास्थळी पोहोचले. सीसीटीव्हीच्या आधारे पोलीस रेखाचित्रे बनवून चोरट्यांचा शोध घेत आहेत. लवकरच चोरांना अटक करण्यात येईल अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.