Anurag Kashyap's daughter threatens to snatch | अनुराग कश्यप यांच्या मुलीला ट्वीटरवरून धमकी
अनुराग कश्यप यांच्या मुलीला ट्वीटरवरून धमकी

ठळक मुद्देया प्रकरणी अंबोली पोलिसांचे सायबर खाते तपास करत आहे. अद्याप या प्रकरणी कोणालाही अटक करण्यात आलेली नसून, आरोपीचा शोध सुरू

मुंबई : चित्रपट निर्माते अनुराग कश्यप यांच्या मुलीबाबत अश्लील वक्तव्य करत तिला धमकाविणाऱ्या विरोधात अंबोली पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. अद्याप या प्रकरणी कोणालाही अटक करण्यात आलेली नसून, आरोपीचा शोध सुरू असल्याचे अंबोली पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक भारत गायकवाड यांनी सांगितले.
अनुराग यांची मुलगी आलिया हिच्याबाबत अश्लील टिष्ट्वट करत तिला धमकावण्यात आले होते. कश्यप यांनी रविवारी सायं. सहाच्या सुमारास अंबोली पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार दाखल केली होती. पोलिसांनी त्यांचा जबाब नोंदवून घेतला होता. या प्रकरणी अंबोली पोलिसांचे सायबर खाते तपास करत आहे. संबंधित ट्वीटर अकाउंट हाताळणाऱ्याचा शोध सुरू आहे.  


Web Title: Anurag Kashyap's daughter threatens to snatch
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.