Chitra Wagh : "उद्धवजी... तुम्हाला काँग्रेसची गुलामी हवीय"; चित्रा वाघ यांची बोचरी टीका

By ऑनलाइन लोकमत | Published: April 23, 2024 12:34 PM2024-04-23T12:34:41+5:302024-04-23T12:43:17+5:30

Lok Sabha Election 2024 BJP Chitra Wagh Slams Uddhav Thackeray : भाजपाच्या नेत्या चित्रा वाघ यांनी उद्धव ठाकरेंवर टीकास्त्र सोडलं आहे. आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत ट्विट केलं आहे.

Lok Sabha Election 2024 BJP Chitra Wagh Slams Uddhav Thackeray And Congress | Chitra Wagh : "उद्धवजी... तुम्हाला काँग्रेसची गुलामी हवीय"; चित्रा वाघ यांची बोचरी टीका

Chitra Wagh : "उद्धवजी... तुम्हाला काँग्रेसची गुलामी हवीय"; चित्रा वाघ यांची बोचरी टीका

उद्धव ठाकरे यांनी भाजपा आणि मोदी सरकारवर सातत्याने टीका केली आहे. ते आपल्या भाषणात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरही निशाणा साधत आहेत. याच दरम्यान आता भाजपानेउद्धव ठाकरेंना जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. "उद्धवजी…. तुम्हाला काँग्रेसची गुलामी हवीये… स्वर्गीय बाळासाहेबांनी स्वतंत्र बाण्याने पक्ष चालवला, तुम्ही तो संकुचित स्वार्थापायी काँग्रेसच्या दावणीला बांधून ठेवलात" असं म्हणत हल्लाबोल केला आहे. 

भाजपाच्या नेत्या चित्रा वाघ यांनी उद्धव ठाकरेंवर टीकास्त्र सोडलं आहे. आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत ट्विट केलं आहे. "उद्धवजी…. तुम्हाला काँग्रेसची गुलामी हवीये… देशाला लुबाडणाऱ्या या परिवारवादी पक्षासमोर तुम्ही लाचारीने सपशेल लोटांगण घातलंय. कारण या लाचारीतून सर्वसामान्य शिवसैनिकांच्या निष्ठा धुडकावून स्वतःचा कौटुंबिक स्वार्थ तेवढा तुम्हाला साधायचा होता."

"स्वर्गीय बाळासाहेबांनी स्वतंत्र बाण्याने पक्ष चालवला, तुम्ही तो संकुचित स्वार्थापायी काँग्रेसच्या दावणीला बांधून ठेवलात. त्यामुळेच स्वतःच्या कुटुंबाला नव्हे तर संपूर्ण देशालाच आपला परिवार मानणाऱ्या मोदी सरकारची तुम्हाला ॲलर्जी आहे. पण उद्धवजी तुम्हाला ज्याची ॲलर्जी आहे, त्याच्यावर देशातील 140 कोटी जनतेची फुल्ल मर्जी आहे…त्यामुळे यावेळीही तुम्हाला सहन करावं लागेल - अब की बार, फिर से एकबार मोदी सरकार..!!" असं चित्रा वाघ यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे. 
 

Web Title: Lok Sabha Election 2024 BJP Chitra Wagh Slams Uddhav Thackeray And Congress

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.