शहरं
Join us  
Trending Stories
1
कबड्डीपटू राणा बालचौरियाची गोळ्या घालून हत्या; सिद्धू मुसेवाला हत्येचा बदला घेतल्याची चर्चा
2
IND vs SA T20I: अक्षर पटेल OUT! फक्त ३ वनडे खेळलेला खेळाडू ३ वर्षांनंतर टीम इंडियात
3
भाजपचा विजयी चौकार की काँग्रेस ठरणार ‘गेमचेंजर’? शिवसेना, राष्ट्रवादीसाठी अस्तित्वाची लढाई
4
IPL 2026 Auction Live Streaming : क्रिकेटर्सवर होणार पैशांची 'बरसात'! कधी अन् कुठे पाहता येईल लिलाव?
5
कुख्यात गँगस्टर सुभाषसिंह ठाकूरचा ताबा मिरा भाईंदर पोलिसांकडे; मंगळवारी कोर्टात हजर करणार
6
कोंबड्यांचा व्यवसायाआड चालणारा अमली पदार्थांचा कारखाना पोलिसांकडून उद्ध्वस्त, ११ अटकेत
7
पार्थ पवारांचा भागीदार दिग्विजय पाटील अखेर पोलिसांसमोर; सव्वा महिन्याने बावधन पोलीस ठाण्यात
8
मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमाला रस्ता वळवताना नियोजनाचा अभाव; शिक्षिकेचा उपचाराअभावी मृत्यू
9
बालविवाह थांबवला..! नवरदेव लग्न मंडपात जाणार होता, पण त्यापूर्वीच दामिनी पथकाची धडक अन्...
10
डोंबिवलीत ४० वार करून खून करणारे आरोपी १२ तासात गजाआड, पाच दिवसांची पोलिस कोठडी
11
लष्कर-ए-तोयबाचा कमांडर साजिद जट्टने रचला पहलगाम हल्ल्याचा कट; NIA चा खुलासा
12
फुटबॉल जगतातील दिग्गजाला जय शाह यांनी दिलं खास निमंत्रण; मेस्सी म्हणाला, "मी नक्कीच पुन्हा येईन!"
13
रणजित गायकवाड यांची हल्ल्यानंतर १० दिवसांनी मृत्यूशी झुंज अपयशी, त्याच दिवशी आरोपी गजाआड
14
उधमपूरमध्ये जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्यांसोबत चकमक; सुरक्षा दलाने संपूर्ण परिसराला घेरले
15
IPL 2026 Auction : खर्चासाठी MI च्या पर्समध्ये फक्त पावणे तीन कोटी; तरीही ते निवांत कारण...
16
शाब्बास पोरा! ४० लाखांचं पॅकेज सोडून वडिलांचं स्वप्न केलं साकार; आधी IPS, मग झाला IAS
17
"बांग्लादेशींना महाराष्ट्रात आणून सत्ताधाऱ्यांच्या जवळचे लोक ड्रग्स कारखाने चालवत आहेत..."
18
उद्धव-राज ठाकरे एकत्र आले अन् काँग्रेसही सोबत गेली तर..? देवेंद्र फडणवीसांचे स्पष्ट उत्तर
19
सुट्टी नाही! रोहित-विराटसाठीच नव्हे तर BCCI नं गिल आणि सूर्यासाठीही केली 'या' गोष्टीची सक्ती
Daily Top 2Weekly Top 5

गजा मारणेच्या सहा साथीदारांचा अटकपूर्व जामीन  फेटाळला, तळेगाव दाभाडे पोलिसात दाखल आहे गुन्हा 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 9, 2021 01:04 IST

अतिरिक्त सत्र न्यायाधीश एस. पी. पिंगळे यांनी हा आदेश दिला. रूपेश कृष्णा मारणे, सुनिल नामदेव बनसोडे, संतोष सुधाकर शाळीमकर, महेश काशिनाथ गुरव, सचिन आप्पा ताकवले, श्रीकांत संभाजी पवार अशी जामीन फेटाळण्यात  आलेल्यांची नावे आहेत. (Anticipatory bail)

पुणे- न्यायालयाने गुंड गजा मारणे याच्या सहा साथीदारांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला आहे. यासंदर्भात, आरोपींनी आणखी कुठे दहशत निर्माण केली आहे का?, गुन्ह्याच्या सखोल तपासासाठी त्यांना अटक होणे गरजेचे आहे. यामुळे त्यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळण्यात यावा, असा युक्तीवाद सरकारी वकिलांनी केला होता. त्यांचा युक्तीवाद मान्य करीत न्यायालयाने गजा मारणे आणि त्याच्या सहकाऱ्यांचा हा अर्ज फेटाळला आहे. (Anticipatory bail denied for six accused with Gaja Marne in pune)अतिरिक्त सत्र न्यायाधीश एस. पी. पिंगळे यांनी हा आदेश दिला. रूपेश कृष्णा मारणे, सुनिल नामदेव बनसोडे, संतोष सुधाकर शाळीमकर, महेश काशिनाथ गुरव, सचिन आप्पा ताकवले, श्रीकांत संभाजी पवार अशी जामीन फेटाळण्यात  आलेल्यांची नावे आहेत. 15 फेब्रुवारी रोजी तळोजा मध्यवर्ती कारागृहातून गुंड गजा मारणे याची सुटका झाली. त्यावेळी मारणे त्याच्या साथीदारांनी सार्वजनिक ठिकाणी दहशत निर्माण करण्याच्या उद्देशाने बेकायदा गर्दी करून फटाके वाजवून आरडा-ओरडा करत त्याचे चित्रीकरण केले. तसेच मास्क न लावता कोरोनाच्या नियमांचे उल्लंघन केले, असे फिर्यादीत म्हटले आहे.     

याप्रकरणी अटकपूर्व जामीन मिळावा यासाठी सहा जणांनी अर्ज केला. यास अतिरिक्त सरकारी वकील विलास घोगरे-पाटील यांनी विरोध केला.  न्यायालयाने सरकारी पक्षाचा युक्तीवाद ग्राह्य धरत सहा जणांचा अर्ज फेटाळून लावला. दरम्यान, या प्रकरणातील मुख्य आरोपी गजानन मारणे याने 25 फेब्रुवारी रोजी वडगाव मावळ येथील प्रथमवर्ग न्यायदंडाधिकाऱ्यां समोर हजर होऊन जामीन घेतला आहे. 

टॅग्स :Courtन्यायालयPuneपुणेPoliceपोलिसCrime Newsगुन्हेगारी