शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांचे साताऱ्याचे उमेदवार अडचणीत; शशिकांत शिंदेंवर आणखी एका घोटाळ्यात एफआयआर
2
शशिकांत शिंदेंना अटक झाली तर महाराष्ट्रात संघर्ष करू; शरद पवार यांचा इशारा
3
माझा 'भाव' विचारला, महिलांचा अपमान केला, मी श्वास घेते हेही काँग्रेसला त्रासदायक; कंगना भावूक
4
Breaking: भाजपचे जोरदार धक्कातंत्र! उज्ज्वल निकमांना लोकसभेची उमेदवारी; पूनम महाजनांचे तिकीट कापले
5
राहुल गांधी रामललाचे दर्शन घेणार? “लोकसभा निवडणुकांमुळे राम मंदिर आठवले”; भाजपाची टीका
6
जॅक नो Chill! २२ वर्षीय पोरानं मुंबईला पाणी पाजले; दिल्लीने उभी केली सर्वोच्च धावसंख्या 
7
“महाराष्ट्र काँग्रेस ठाकरे गटात विलीन झाल्यास आश्चर्य वाटायला नको”; संजय निरुपम यांची टीका
8
Ohh Shit! रोहित शर्माने धाव पूर्ण होताच रिषभ पंतला मारला जोरात धक्का अन्... 
9
रिषभ पंतवर मुंबईचा कर्णधार हार्दिक पांड्या खवळला, अम्पायरकडे तक्रार करताना दिसला
10
हृदयद्रावक! ६ महिन्यांचा लेक पोरका झाला; भारतमातेच्या हुतात्मा सुपुत्राला अखेरचा निरोप
11
"हमासच्या दहशतवाद्याने अंगठी देऊन मला प्रपोज केलं अन् म्हणाला..."; तरूणीने सांगितला भयानक किस्सा
12
शिरूरमध्ये अटीतटीची लढाई, वळसे पाटील लवकरच मैदानात; आढळरावांबद्दल म्हणाले...
13
“PM मोदींनी शेतकऱ्यांसाठी मोठे निर्णय घेतले, काँग्रेसने फक्त चॉकलेट दाखवले”; फडणवीसांची टीका
14
ममता बॅनर्जी हेलिकॉप्टरमध्येच पडल्या, दोन वर्षांतली चौथी घटना
15
इंटिमेट सीन्समुळे अनेक चित्रपट गमावले, आईवडिलांची नव्हती परवानगी; मृणाल ठाकुरचा खुलासा
16
९ चौकार, ३ षटकार! २२ वर्षीय जॅक फ्रेझर-मॅकगर्कची वेगवान फिफ्टी; बुमराहलाही धू धू धुतले 
17
“अशोक चव्हाण मोठे नेते असते तर मोदी-शाहांनी नांदेडमध्ये सभा घेतली नसती”: बाळासाहेब थोरात
18
"तू बारामतीचा उमेदवार बदल, मी प्रचार करतो"; अजितदादांनी सांगितला श्रीनिवास पवारांचा किस्सा
19
मला का काढलं? Prithvi Shaw भर मैदानात रिकी पाँटिंगसोबत वाद घालताना दिसला
20
Sadguru Diet: सद्गुरू सांगताहेत बॅलेन्स डाएटचा कानमंत्र; वजन कमी होईल आणि नियंत्रितही राहील!

एकाच दिवशी लाच लुचपत प्रतिबंधक विभागाची तीन ठिकाणी सापळा रचून कारवाई

By ऑनलाइन लोकमत | Published: April 25, 2019 9:22 PM

लाच लुचपत प्रतिबंधक विभागाचे गुरुवारी एकाच दिवशी तीन ठिकाणी पोलिसांवर सापळा कारवाई करुन तीन पोलिसांसह चौघांना पकडले आहे़.

ठळक मुद्देसहायक फौजदार, हवालदार मुख्यालयातील वरिष्ठ लिपिक जाळ्यात

पुणे : लाच लुचपत प्रतिबंधक विभागाचे गुरुवारी एकाच दिवशी तीन ठिकाणी पोलिसांवर सापळा कारवाई करुन तीन पोलिसांसह चौघांना पकडले आहे़. ही कारवाई वानवडी पोलीस ठाण्याचा पोलीस हवालदार, शिवाजीनगर पोलीस मुख्यालयातील वरिष्ठ लिपिक आणि शिक्रापूर पोलीस ठाण्यातील सहायक पोलीस फौजदार अशा तिघांवर कारवाई करण्यात आली आहे़. तक्रारदार यांच्याविरुद्ध शिक्रापूर पोलीस ठाण्यात तक्रार अर्ज प्राप्त होता़. या अर्जाची चौकशी करुन गुन्हा दाखल न करण्यासाठी सहायक पोलीस फौजदार अनिल कोळेकर (वय ५४) यांनी २० हजार रुपयांची लाच मागितली़. लाच लुचपत प्रतिबंधक विभागाला ही तक्रार मिळाल्यानंतर गुरुवारी त्याची पडताळणी करण्यात आली़. त्यानंतर कोरेगाव भीमा पोलीस चौकीत सापळा रचला़ तक्रारदाराकडून २० हजार रुपये स्वीकारताना अनिल बाबुराव कोळेकर याला पकडण्यात आले़. सातव्या वेतन आयोगाप्रमाणे वेतन निश्चिती करण्याचे काम करणाऱ्या शिवाजीनगर पोलीस मुख्यालयातील वरिष्ठ लिपिक मनोज हरी काळे (वय ५२) यांनी वेतन निश्चितीसाठी सहायक पोलीस निरीक्षकाकडे ३ हजार रुपयांची लाच मागितली होती़. याबाबतची तक्रार मिळाल्यानंतर लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने शिवाजीनगर पोलीस मुख्यालयात सापळा रचला़ तक्रारदाराकडून ३ हजार रुपये लाच घेताना मनोज काळे यांना पकडण्यात आले़. चोरीचा माल खरेदी करत असल्याचा आरोप करत कारवाई न करण्यासाठी भंगार व्यवसायिकाकडून ५ हजार रुपयांची लाच घेताना खासगी व्यक्तीसह पोलीस हवालदाराला लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून पकडले़. पोलीस हवालदार निसार मेहमुद खान (वय ४४) आणि मेहंदी अजगर शेख (वय ३२, रा़ हडपसर) अशी पकडलेल्या दोघांची नावे आहेत़. .याप्रकरणी एका ४५ वर्षांच्या महिलेने तक्रार दिली होती़. तक्रारदार यांचा हडपसर येथील आनंदनगरमध्ये भांगाराचा व्यवसाय आहे़. पोलीस हवालदार निसार खान याने त्यांच्यावर चोरीचा माल खरेदी करीत असल्याचा आरोप करुन तशा तक्रारी आल्या आहेत, असे सांगितले़. त्यामध्ये कारवाई करायची नसेल व भंगाराचा धंदा पुढे चालू ठेवायचा असेल तर १५ हजार रुपयांची मागणी केली़. तेव्हा या महिलेने लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे २४ एप्रिलला तक्रार केली़. तक्रारीची पडताळणी करताना हवालदार खान याने ५ हजार रुपये स्वीकारण्याची तडजोड केली़. त्यानुसार गुरुवारी दुपारी हडपसर येथील ताज फर्निचरजवळ सापळा रचण्यात आला़. खान याच्या सांगण्यावरुन मेहंदी शेख याला पकडण्यात आले़ त्यानंतर खान यांनाही ताब्यात घेण्यात आले आहे़.

टॅग्स :PuneपुणेCorruptionभ्रष्टाचारCrime Newsगुन्हेगारीAnti Corruption Bureauलाचलुचपत प्रतिबंधक विभाग