लिव्ह इनची आणखी एक तरुणी बळी! पार्टनरने छातीत, डोक्यात गोळ्या झाडल्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 18, 2023 08:36 IST2023-08-18T08:35:32+5:302023-08-18T08:36:23+5:30

रिया आणि ऋषभमध्ये काही गोष्टीवरून वाद झाला होता. भांडणाच्या वेळी, ऋषभने रियाला गोळ्या घातल्या, परिणामी तिचा मृत्यू झाला.

Another young victim of Live In! The partner shot him in the chest and head | लिव्ह इनची आणखी एक तरुणी बळी! पार्टनरने छातीत, डोक्यात गोळ्या झाडल्या

लिव्ह इनची आणखी एक तरुणी बळी! पार्टनरने छातीत, डोक्यात गोळ्या झाडल्या

उत्तर प्रदेशची राजधानी लखनऊमध्ये लिव्ह इन रिलेशनशिपचा आणखी एक काळा चेहरा समोर आला आहे. सुशांत गोल्फ सिटी भागातील एका तरुणीला तिच्या लिव्ह इन पार्टनरने गोळी झाडली आहे. यामध्ये त्या तरुणीचा मृत्यू झाला आहे. या घटनेनंतर त्या तरुणाने पोलिसांत शरणागती पत्करली आले. 

ही तरुणी घटस्फोटीत होती. तसेच आरोपी तरुणासोबत ती गेल्या काही महिन्यांपासून लिव्ह इनमध्ये राहत होती. या प्रकरणाचा तपास करत असल्याचे पोलिसांनी सांगितले. रिया गुप्ता नावाची ही तरुणी पॅराडाईज क्रिस्टल अपार्टमेंटमध्ये राहत होती. तिचा लिव्ह इन पार्टनर ऋषभ सिंह भदौरिया हा देखील तिच्यासोबत राहत होता. 

रिया आणि ऋषभमध्ये काही गोष्टीवरून वाद झाला होता. भांडणाच्या वेळी, ऋषभने रियाला गोळ्या घातल्या, परिणामी तिचा मृत्यू झाला. कृष्णा नगर येथील रहिवासी असलेल्या ऋषभने गुन्हा केल्यानंतर पोलिसांसमोर आत्मसमर्पण केले. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. आरोपीने मुलीच्या छातीत आणि डोक्यात गोळी झाडल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे.
 

Web Title: Another young victim of Live In! The partner shot him in the chest and head