माहिम हत्याप्रकरणात आणखी एक अवयव सापडला
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 12, 2019 17:11 IST2019-12-12T17:07:26+5:302019-12-12T17:11:55+5:30
या प्रकरणातील तिसऱ्या सुटकेसचा शोधही सुरू आहे.

माहिम हत्याप्रकरणात आणखी एक अवयव सापडला
ठळक मुद्देमिठी नदीतून बुधवारी मांडीचा भाग असलेली एक सुटकेस समुद्रात सापडली.एक सुटकेस माहिमच्या समुद्रात सापडली होती. त्यांच्या शरीराचे ८ तुकडे करत ते मिठी नदीत फेकून दिले.
मुंबई - माहिम हत्याप्रकरणात मानस पिता बेनेट रिबेलो (५९) यांच्या एका पायाच्या मांडीचा भाग बुधवारी मिठी नदीत एका सुटकेसमध्ये सापडला.
१९ वर्षांची मानसकन्या आराध्याने १६ वर्षांच्या प्रियकराच्या मदतीने रिबेलो यांची हत्या केली. त्यानंतर त्यांच्या शरीराचे ८ तुकडे करत ते मिठी नदीत फेकून दिले. एक सुटकेस माहिमच्या समुद्रात सापडली होती. पोलिसांनी गुन्ह्याची उकल केल्यानंतर, तपासाअंती रिबेलो यांचा एक हात आणि एक पाय असलेली दुसरी सुटकेस बीकेसीमधून मंगळवारी हस्तगत केली. त्यापाठोपाठ मिठी नदीतून बुधवारी मांडीचा भाग असलेली एक सुटकेस समुद्रात सापडली. या प्रकरणातील तिसऱ्या सुटकेसचा शोधही सुरू आहे.