संतापजनक! किंचाळ्या ऐकून वडील गेले अन् मुलीवर बलात्कार करणाऱ्या नराधमास केला प्रतिकार
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 19, 2022 20:37 IST2022-01-19T20:33:05+5:302022-01-19T20:37:28+5:30
Rape Case : अल्पवयीन मुलगी, इयत्ता 8 ची विद्यार्थिनी आहे. वडील आणि एका लहान भावासोबत ती राहत होती.

संतापजनक! किंचाळ्या ऐकून वडील गेले अन् मुलीवर बलात्कार करणाऱ्या नराधमास केला प्रतिकार
उत्तर प्रदेशातील बागपत जिल्ह्यात एका अल्पवयीन मुलीवर तिच्या घराबाहेर बलात्कार झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. अल्पवयीन मुलगी, इयत्ता 8 ची विद्यार्थिनी आहे. वडील आणि एका लहान भावासोबत ती राहत होती.
ती घरात झोपली असताना ही घटना घडली.
पीडितेच्या वडिलांनी आपल्या तक्रारीत खुलासा केला की, आरोपीने आपल्या मुलीला घराबाहेर ओढून नेले आणि तिच्यावर बलात्कार केला. टाईम्स नाऊने दिलेल्या वृत्तानुसार, तिच्या किंकाळ्या ऐकून वडील घटनास्थळी गेले आणि 45 वर्षीय आरोपीशी झटापट झाली.
दुःखद! १६ वर्षीय विद्यार्थिनी राहिली गरोदर; आत्महत्येनंतर प्रिन्सिपल, वॉर्डनसह ३ जणांना अटक
आरोपीने अल्पवयीन मुलीवर बलात्कार तर केलाच, पण आरोपीने वडिलांवर देशी बनावटीच्या पिस्तुलाने मारहाण करून जखमी केले. वडिलांना धमकावून आरोपीने तेथून पळ काढला. सुरुवातीला, समाजात लागणाऱ्या कलंकाच्या भीतीने कुटुंबीयांनी तक्रार दाखल केली नाही, परंतु नंतर, वडिलांनी एसपी कार्यालयात तक्रार नोंदवली, त्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला. तपास सुरू असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले.