संतापजनक! विनयभंग करुन तरुणीला केली मारहाण; संरपंचासह १७ जणांवर गुन्हा दाखल
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 15, 2021 15:16 IST2021-03-15T15:16:27+5:302021-03-15T15:16:43+5:30
किनगाव पोलीस ठाण्यात सरंपचासह १७ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

संतापजनक! विनयभंग करुन तरुणीला केली मारहाण; संरपंचासह १७ जणांवर गुन्हा दाखल
लातूर : अहमदपूर तालुक्यातील कोपरा येथे फिर्यादीच्या घरासमोर सार्वजनिक बांधकाम करताना माझी आई बाहेर गेली आहे, आल्यानंतर काम करा, असे सांगूनही आरोपींनी बेकायदेशीर मंडळी जमवून तरुणीचा विनयभंग करून मारहाण केल्याची घटना घडली. याप्रकरणी किनगाव पोलीस ठाण्यात सरंपचासह १७ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फिर्यादी सुलोचना ज्ञानोबा कदम या शुक्रवारी दुपारी १ वाजेच्या सुमारास घरासमोर थांबल्या असत्या, सरपंच गंगाधर देपे, बालाजी आचार्य, ग्रामसेवक, प्रशांत आचार्य, कांचन आचार्य, राहुल कांबळे, गहिनीनाथ आचार्य, सुभाष टेलर, मैनाबाई आचार्य, शांताबाई आचार्य यांच्यासह १७ जणांनी एकत्रित येऊन सार्वजनिक कामासाठी सफाई करत असताना मंडळी जमवून फिर्यादीस बेदम मारहाण केली.
शासकीय कामात अडथळा...
दरम्यान, कोपरा येथे सार्वजनिक ठिकाणी सभागृहाचे कामकाज करण्यासाठी साफसफाई करत असताना फिर्यादी हा ग्रामपंचायतीच्या मालकीच्या जागेत सफाई करून घेत असताना सुलोचना ज्ञानोबा कदम व मंगल ज्ञानोबा कदम यांनी कामात अडथळा निर्माण करून दगड फेकून मारले. शिवीगाळ करून जेसीबीचे नुकसान केले. याबाबत ग्रामसेवक रवींद्र क्षीरसागर यांनी भादा पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीनुसार सुलोचना ज्ञानोबा कदम व मंगल ज्ञानोबा कदम (रा. दोघेही कोपरा) दोघींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा तपास उपविभागीय अधिकारी बी. एस. लांजिले हे करत आहेत.