शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
3
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल
4
वर्दीचा सन्मान राखा; एकनाथ शिंदे यांची आमदार गायकवाड यांना भर सभेत समज!
5
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
6
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
7
धक्कादायक! लेकीचा प्रेमविवाह, बापाचा गोळीबार, लेक जागीच ठार
8
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
9
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
10
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
11
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
12
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
13
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
14
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
15
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
16
अत्याचारामुळे आम्ही पाक सोडले, त्यांना धडा शिकवा; भारतीय नागरिकत्वाच्या प्रतीक्षेत असलेले ६० पाकिस्तानी कोल्हापुरात
17
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
18
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
19
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
20
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान

Anil Deshmukh:...अन् म्हणून दुसऱ्यांदा सीबीआयचं पथक अनिल देशमुखांच्या घरी धडकलं; नेमकं काय घडलं?

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 25, 2021 23:37 IST

जुने संगणक अन् लॅपटॉपची तपासणी - प्रत्येक चिजवस्तूची बारीकसारीक नोंद

ठळक मुद्देशनिवारी सकाळी ७.३० ते ७.४५च्या सुमारास २ महिलांसह १० जणांचा समावेश असलेले सीबीआयचे पथक देशमुखांच्या निवासस्थानी दाखल झालेप्रत्येक कागदपत्रांचीही बारकाईने पाहणी करून त्यातून काही नोंदी केल्यानंतर देशमुख यांची चौकशी केलीघरात काही जुने संगणक, लॅपटॉप पडले होते, त्याची आठवण झाली. त्याचमुळे पुन्हा पाच अधिकारी एका वाहनात आले आणि त्यांनी पुन्हा त्या संगणक, लॅपटॉपची तपासणी केली.

 नरेश डोंगरे

नागपूर : माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या नागपुरातील निवासस्थानी प्रदीर्घ तपासणी तसेच चाैकशी करून निघून गेलेल्या सीबीआयच्या अधिकाऱ्यांना रस्त्याने जाताना जुन्या संगणक, लॅपटॉपची आठवण झाली अन् त्याचमुळे ते पुन्हा परतले. दुसऱ्यांदा परत जाताना त्यांनी देशमुख यांच्याकडच्या जुन्या संगणक, लॅपटॉपच्या हार्डडिस्कची तपासणी करून त्या ताब्यात घेतल्या.

एनआयएच्या ताब्यात असलेला वादग्रस्त एपीआय सचिन वाझे याला १०० कोटींच्या वसुलीचे टार्गेट दिल्याचा आरोप करणारा लेटरबॉम्ब मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबिर सिंग यांनी टाकला. त्यामुळे अडचणीत आलेल्या देशमुख यांची सीबीआयच्या पथकाने शनिवारी तब्बल ११ तास चाैकशी केली. सायंकाळी ६.३० ला सीबीआयचे पथक देशमुख यांच्या निवासस्थानाहून बाहेर पडले आणि लगेच अर्धा तासाने पुन्हा परतले. त्यामुळे ते कशासाठी परतले, नंतरच्या दोन तासांत त्यांनी कोणती चाैकशी केली आणि काय सोबत नेले, असे विविध प्रश्न चर्चेला आले आहेत. ‘लोकमत’ने त्याचे उत्तर जाणून घेण्यासाठी या संबंधाने संबंधित सूत्रांकडे सकाळपासून पाठपुरावा केला. मात्र, सीबीआय अथवा देशमुख यांच्याकडून कसलीही अधिकृत माहिती उपलब्ध झाली नाही. तथापि, खास सूत्रांकडून उपरोक्त माहिती पुढे आली. त्यानुसार, शनिवारी सकाळी ७.३० ते ७.४५च्या सुमारास २ महिलांसह १० जणांचा समावेश असलेले सीबीआयचे पथक देशमुखांच्या निवासस्थानी दाखल झाले. या पथकाने येथे सलग ११ तास चाैकशी केली. त्यांनी देशमुख यांच्या निवासस्थानाचा कानाकोपरा तपासला. प्रत्येक कपाट, लॉकर, टेबलचे ड्रॉवर, संगणक आणि मोबाइलचीही तपासणी केली. प्रत्येक कागदपत्रांचीही बारकाईने पाहणी करून त्यातून काही नोंदी केल्यानंतर देशमुख यांची चौकशी केली. हे काय आहे, ते कुठून आणले, कधी घेतले वगैरे अशा स्वरूपाची ही चाैकशी होती. ती आटोपल्यानंतर सायंकाळी ६.३० ला चार अधिकारी अर्टिगा तर ६ अधिकारी इनोव्हात बसून निघून गेले. परत जाताना अधिकाऱ्यांनी आपसात चर्चा करताना घरात काही जुने संगणक, लॅपटॉप पडले होते, त्याची आठवण झाली. त्याचमुळे पुन्हा पाच अधिकारी एका वाहनात आले आणि त्यांनी पुन्हा त्या संगणक, लॅपटॉपची तपासणी केली. त्यांच्या हार्डडिस्क आणि अन्य काही पार्ट ताब्यात घेतले. नंतर ९.३० ला हे पथक निघून गेले.

ते पुन्हा येतील ?

दुसऱ्या वेळी जेव्हा अधिकारी देशमुखांच्या निवासस्थानी धडकले तेव्हा आता काही तरी वेगळी कारवाई होणार, अशी चर्चा सर्वत्र सुरू झाली. त्याचमुळे देशमुखांच्या निकटस्थ मंडळींनी निवासस्थानासमोर जमायला सुरुवात केली. मात्र, दुसऱ्या वेळीदेखील अधिकाऱ्यांचे पथक निघून गेल्याने ते पुन्हा परत येतील, असा अंदाज बांधत मध्यरात्री १ वाजेपर्यंत प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींसह अनेक जण तेथे उभे होते. देशमुख काटोल दाैऱ्यावरून परतले अन् पहाटे २ नंतर गर्दी ओसरली.

‘ती’ वाहने सीबीआयचीचसीबीआयचे अधिकारी ज्या वाहनातून आले तरी नवी कोरी, चकचकीत नव्हे तर पाच-दहा वर्षे जुनी असल्यासारखी दिसत होती. अर्टिगा दिल्ली पासिंगची (डीएल २ - सीएव्ही ८८९८) तर इनोव्हा (एमएच ३१- डीझेड ९९९९) नागपूर पासिंगची होती. आयपीएस अधिकाऱ्यांच्या वाहनावर प्रोटोकॉलनुसार निळा दिवा असतो. मात्र, असा कोणताही दिवा दोन पैकी एकाही गाडीवर नव्हता. त्यामुळे ही वाहने कुणाची आहेत, असा प्रश्नही पत्रकार मंडळी उपस्थित करीत होते. ही दोन्ही वाहने नागपूर आणि नवी दिल्ली सीबीआय कार्यालयाचीच असल्याचे आज स्पष्ट झाले.

 

 

टॅग्स :Anil Deshmukhअनिल देशमुखCBIगुन्हा अन्वेषण विभागParam Bir Singhपरम बीर सिंग