संतापलेल्या पत्नीने पतीला बदडून काढत घेतली पोलीस ठाण्यात धाव; पोटच्या मुलीवर अतिप्रसंगाचा प्रयत्न
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 15, 2021 19:42 IST2021-06-15T19:42:14+5:302021-06-15T19:42:59+5:30
Father Molestated Daughter : गिट्टीखदानमधील घटना; नराधम गजाआड

संतापलेल्या पत्नीने पतीला बदडून काढत घेतली पोलीस ठाण्यात धाव; पोटच्या मुलीवर अतिप्रसंगाचा प्रयत्न
नागपूर : पोटच्या अल्पवयीन मुलीचा लैंगिक छळ करून तिच्यावर अतिप्रसंग करण्याचा एका नराधमाने प्रयत्न केला. तीन आठवड्यापासून सुरू असलेला त्याचा छळ असह्य झाल्याने संतापलेल्या आई आणि मुलीने त्याला बदडून काढत पोलीस ठाण्यात धाव घेतली. गिट्टीखदानमधील ही घटना आहे.
आरोपी ४० ते ४५ वर्षाचा आहे. तो आधी टेलरिंगचे काम करायचा त्याला दारू गांजा असे सर्वच व्यसन आहे. व्यसनाधीन झाल्यामुळे त्याच्याकडे कपडे शिवायला कुणी येत नव्हते. त्यामुळे तो व्यसन भागविण्यासाठी मोलमजुरी करतो. त्याला १४ वर्षाची मुलगी आहे. पत्नी घरी नसताना किंवा ती रात्रीच्या वेळी गाढ झोपेत असताना तो या मुलीचा लैंगिक छळ करू लागला. २५ मे पासून त्याचे हे कृत्य सुरू आहे. रविवारी मध्यरात्री त्याने असाच प्रयत्न केला. मुलीने आईला या छळाची आधीच कल्पना देऊन ठेवली होती. त्यामुळे रविवारी मध्यरात्री त्याने मुलीसोबत अश्लील चाळे सुरू करताच संतापलेल्या पत्नी आणि मुलीने त्याला बदडून काढले. नंतर सोमवारी सकाळी पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवली. पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपीला अटक केली. त्याला मंगळवारी कोर्टासमोर हजर केले.
विकृत मानसिकता !
या नराधमाला अमली पदार्थांचे व्यसन आहेच. सोबत मोबाईलमध्ये पॉर्न फिल्म बघण्याचीही त्याला सवय आहे. वेळ मिळाला की तो मोबाईलमध्ये अश्लील चित्रफीत बघण्यात दंग होतो. त्यातूनच त्याला पोटच्या मुलीसोबत अश्लील चाळे करण्याची विकृती जडली असावी, असा अंदाज आहे.