वहिनीला दिराने फोनवर बोलताना पाहिले अन् रागाच्या भरात घेतला जीव
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 26, 2021 21:05 IST2021-11-26T21:04:36+5:302021-11-26T21:05:40+5:30
Murder Case :

वहिनीला दिराने फोनवर बोलताना पाहिले अन् रागाच्या भरात घेतला जीव
जबलपूर - मध्य प्रदेशातील जबलपूरमध्ये वहिनीला फोनवर बोलताना पाहून दिराला इतका राग आला की त्याने तिचा जीव घेतला. वहिनी कुठल्यातरी मुलाशी बोलत असल्याचा संशय दिराला आला. दिराने रागाच्या भरात वहिनीला मारले. यानंतर आरोपीने स्वत: पोलीस ठाणे गाठून गुन्ह्याची कबुली दिली.
घटना जबलपूरच्या बकरा मंडी भागातील आहे. मिळालेल्या माहितीनुसार, गुरुवारी संध्याकाळी चार वाजता राजा चक्रवर्ती कामावरून घरी परतला तेव्हा त्याने त्याची वहिनी रोशनी फोनवर बोलताना दिसली. फोनवर बोलताना ती हसत होती. राजाने वहिनीला विचारले की ती कोणाशी बोलत आहे? वहिनी म्हणाली, तुझा याच्याशी काय संबंध आहे.
उत्तर ऐकून राजाला राग आला आणि त्याने घरात ठेवलेला विळा उचलला. त्याने तिच्या वहिनीला गळ्यावर वार करून मारले, त्यामुळे तिचा जागीच मृत्यू झाला. यानंतर राजाने स्वत: पोलीस ठाणे गाठून गुन्ह्याची कबुली दिली.
हनुमानताल पोलीस ठाण्याचे प्रभारी उमेश गुलानी यांनी सांगितले की, आरोपी राजा आणि त्याचा मोठा भाऊ प्रदीप एकत्र राहतात. प्रदीप मातीची भांडी बनवतो तर राजा चक्रवर्ती मेकॅनिक आहे. सध्या हनुमानताल पोलीस ठाण्याने आरोपी राजाला ठार मारल्याच्या कबुलीबाबत तपास सुरू केला आहे.