अंगणवाडी सेविकेची विहिरीत उडी मारून आत्महत्या
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 24, 2021 14:11 IST2021-05-24T14:10:29+5:302021-05-24T14:11:01+5:30
Suicide Case : ही घटना रविवारी सायंकाळच्या सुमारास घडली.

अंगणवाडी सेविकेची विहिरीत उडी मारून आत्महत्या
ठळक मुद्दे शोभाताई लोमेश खोब्रागडे (२५) असे मृतक महिलेचे नाव आहे.
चंद्रपूर : मूल पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या बेंबाळ पोलीस चौकी हद्दीतील चकदुगाळा येथील अंगणवाडी सेविका पदावर कार्यरत असलेल्या एका विवाहित महिलेने विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली. ही घटना रविवारी सायंकाळच्या सुमारास घडली.
शोभाताई लोमेश खोब्रागडे (२५) असे मृतक महिलेचे नाव आहे. सदर घटनेची माहिती बेंबाळ पोलिसांना देण्यात आली असून पोलिसांनी ताबडतोब घटनास्थळ गाठून पंचनामा केला. शोभाताई या मधुमेह, रक्तदाब या आजाराने त्रस्त होत्या. यातून तिने आत्महत्या केली असावी, असा अंदाज आहे.
लाजिरवाणा प्रकार! १२ वर्षाच्या चिमुरडीला ओलीस ठेवून घरमालकाच्या मुलासह मित्राने केला गँगरेप
लाजिरवाणा प्रकार! १२ वर्षाच्या चिमुरडीला ओलीस ठेवून घरमालकाच्या मुलासह मित्राने केला गँगरेप https://t.co/B18IBsI4GR
— Lokmat (@MiLOKMAT) May 24, 2021