"भाऊ, मी यावेळी राखी बांधू शकणार नाही"; पती आणि सासरच्यांना कंटाळून महिलेने संपवलं जीवन
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 5, 2025 11:10 IST2025-08-05T11:09:03+5:302025-08-05T11:10:13+5:30
२४ वर्षीय श्रीविद्याने तिचा पती रामबाबूकडून झालेल्या शारीरिक आणि भावनिक छळाबाबत माहिती दिली.

फोटो - जनसत्ता
आंध्र प्रदेशच्या कृष्णा जिल्ह्यातील एका कॉलेज लेक्चररने लग्नानंतर अवघ्या सहा महिन्यांत आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. इंडिया टुडेच्या रिपोर्टनुसार, महिलेने तिचा पती आणि त्याच्या कुटुंबावर सतत अत्याचार केल्याचा आरोप करणारी हृदयद्रावक सुसाईड नोट लिहिली आहे.
२४ वर्षीय श्रीविद्याने तिचा पती रामबाबूकडून झालेल्या शारीरिक आणि भावनिक छळाबाबत माहिती दिली आणि तिच्या भावाला शेवटचा रक्षाबंधन मेसेज लिहून आयुष्य संपवलं आहे. श्रीविद्या नावाची ही महिला एका खासगी कॉलेजमध्ये लेक्चरर म्हणून काम करत होती आणि सहा महिन्यांपूर्वीच गावातील रामबाबूशी लग्न झालं होतं.
श्रीविद्याच्या सुसाईड नोटनुसार, लग्नानंतर अवघ्या एक महिन्यानंतर तिच्यावर खूप अत्याचार सुरू झाले. रामबाबू दारू पिऊन घरी यायचा, तिला मारहाण करायचा आणि सतत तिचा अपमान करायचा हे सांगितलं. तसेच त्याने बेडवर देखील तिचं डोकं आपटलं, बेदम मारहाण केली. हिंसाचाराच्या अनेक घटना सांगितल्या.
रक्षाबंधनाच्या आधी तिने भावाला एक इमोशनल मेसेज लिहिला, “भाऊ, स्वतःची काळजी घे. मी कदाचित यावेळी तुला राखी बांधू शकणार नाही” असं म्हटलं. श्रीविद्याने पतीला आणि त्याच्या कुटुंबाला यासाठी जबाबदार धरलं. तसेच त्यांना सोडू नका असंही म्हटलं आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून ते अधिक तपास करत आहेत.