सावत्र वडिलाने १६ वर्षीय अल्पवयीन मुलीला आपल्या वासनेची केली शिकार; काकाही सहभागी 

By सूरज.नाईकपवार | Published: February 1, 2024 12:16 PM2024-02-01T12:16:08+5:302024-02-01T12:16:14+5:30

दोघांनाही पोलिसांना ठोकल्या बेडया

An incident of sexual harassment of a 16-year-old minor girl by her stepfather has taken place in Goa | सावत्र वडिलाने १६ वर्षीय अल्पवयीन मुलीला आपल्या वासनेची केली शिकार; काकाही सहभागी 

सावत्र वडिलाने १६ वर्षीय अल्पवयीन मुलीला आपल्या वासनेची केली शिकार; काकाही सहभागी 

मडगाव: सावत्र वडिलाने १६ वर्षीय अल्पवयीन मुलीला आपल्या वासनेची शिकार बनविल्याची धक्कदायक बाब उघडकीस आली आहे. या किळसवाणी कृत्यात त्या पिडिताच्या सावत्र काकाही सहभागी होता. या दोघांच्या हातात गोव्यातील  मायणा कुडतरी पोलिसांनी बेडया ठोकल्या आहेत. याच पोलिस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली आहे.पोलिस निरीक्षक अरुण गावस देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक प्रशांत भगत पुढील तपास करीत आहेत. भादंसंच्या ३७६, ३७६ (३) , ३५४ (अ) , गोवा बाल कायदा कलम ८ व बाल सरंक्षण कायदा कलम ४ व ८ अंतर्गंत संशयितांवर पोलिसांनी गुन्हा नोंद केला आहे.

डिसेंबर २०२० ते २९ जानेवारी २०२४ पर्यंत तो नराधम सावत्र वडिल त्या मुलीवर लैंगिक अत्याचार करीत होता.सावत्र काकाही तिला त्रास देत होता. तो तिला स्पर्श करीत होत. त्या पिडिताची आई आखातात दुबई येथे कामाला आहे. पहिल्या पतीपासून ती वेगळी झाल्यानंतर तिने दुसरा घरोबा केला होता. सदया ती आखातात असून, पिडित, तिचा सावत्र वडिल , काका व दोन वर्षाचा सावत्र भाउ एकत्र रहात होते.
बुधवारी मायणा कुडतरी पोलिस ठाण्यात यासंबधी तक्रार नोंद झाल्यानंतर पोलिसांनी लागलीच कारवाई करुन दाेन्हीही संशयितांच्या मुसक्या आवळल्या.

Web Title: An incident of sexual harassment of a 16-year-old minor girl by her stepfather has taken place in Goa

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.