शिक्षकाने प्रॅक्टिकलमध्ये चांगले गुण देण्याचे आश्वासन दिलं; विद्यार्थीवर दबाव टाकला अन्....

By ऑनलाइन लोकमत | Published: February 10, 2024 10:38 AM2024-02-10T10:38:35+5:302024-02-10T10:53:02+5:30

एका शिक्षकावर पॉक्सो कायद्यानुसार कारवाई करण्यात आली आहे.

An incident has taken place in Rajasthan where a teacher harrasment a class 12 student. | शिक्षकाने प्रॅक्टिकलमध्ये चांगले गुण देण्याचे आश्वासन दिलं; विद्यार्थीवर दबाव टाकला अन्....

शिक्षकाने प्रॅक्टिकलमध्ये चांगले गुण देण्याचे आश्वासन दिलं; विद्यार्थीवर दबाव टाकला अन्....

राजस्थानमधील टोंक येथील सरकारी शाळेत एका शिक्षकाने १२वीच्या विद्यार्थीनीसोबत अश्लील कृत्य केल्याची घटना घडली आहे. प्रॅक्टिकलमध्ये चांगले गुण देण्याचे आश्वासन देऊन शिक्षिकेने तिच्यावर शारीरिक संबंधासाठी दबाव टाकल्याचा आरोप आहे. अस्वस्थ झालेल्या विद्यार्थिनीने संपूर्ण हकीकत घरच्यांना सांगितली. यानंतर कुटुंबीयांनी गुन्हा दाखल केला. एका शिक्षकावर पॉक्सो कायद्यानुसार कारवाई करण्यात आली आहे.

सदर प्रकरण शिक्षण विभागापर्यंत पोहोचल्यावर आरोपी जीवशास्त्र शिक्षक कमलेश कुमार मीना आणि अशोक कुमार मीना यांना निलंबित करण्यात आले. निलंबनादरम्यान दोघांचे मुख्यालय शिक्षण संचालनालय, बिकानेर येथे ठेवण्यात आले आहे. पीडित विद्यार्थ्याच्या तक्रारीवरून शिक्षण विभागाचे पथक शाळेत पोहोचले असता आरोपी शिक्षक कमलेश कुमार मीणा आणि अशोक कुमार मीणा यांच्यावर अनेक गंभीर आरोप समोर आले. 

पीडितेने सांगितले की, तीन महिन्यांपासून केवळ तिचा विनयभंग केला जात नव्हता, तर अश्लील मेसेजही पाठवले जात होते. प्रॅक्टिकलमध्ये चांगले गुण देण्याच्या बदल्यात शिक्षक कमलेश कुमार मीणा याने तिच्यावर चुकीचे काम करण्यासाठी दबाव आणल्याचा आरोप पीडितेने केला आहे. पीडितेच्या भावासह अनेक ग्रामस्थांनी शाळा गाठून मुख्याध्यापकांसमोर निदर्शने करत कारवाईची मागणी केली. ग्रामस्थांचा विरोध पाहता तातडीने चौकशी समिती स्थापन करून पथक गायरोलीला पाठवण्यात आले. चौकशी समितीच्या अहवालानंतर दोन्ही शिक्षकांना तडकाफडकी निलंबित करण्यात आले.

पीडितेच्या भावाच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल 

याप्रकरणी पीडितेच्या भावाने पोलिसांत तक्रार केली. तक्रारीच्या आधारे पोलिसांनी शिक्षकाविरुद्ध पॉक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. पोलीस या प्रकरणाचा सखोल तपास करत असल्याचे घाड पोलीस ठाण्याचे अधिकारी म्हणाले. सीबीईओ रामसहय मीना यांनी सांगितले की, आम्हाला या प्रकरणाची माहिती मिळाली आहे. शिक्षण विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी आम्हाला येथे पाठवले आहे. तीन सदस्यांची समिती स्थापन करण्यात आली आहे. आम्ही तपास अहवाल तयार केला असून, पुढील कारवाईसाठी तो वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे सोपवला जाईल.

Web Title: An incident has taken place in Rajasthan where a teacher harrasment a class 12 student.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.