पाचवीत शिकणाऱ्या मुलीवर नराधमाचा अत्याचार; शाळेतून नेले लॉजवर, पुण्यातील घटना
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 24, 2022 21:54 IST2022-12-24T21:53:59+5:302022-12-24T21:54:41+5:30
पाचवीत शिकणाऱ्या मुलीला शाळेतून लॉजवर नेऊन अत्याचार केल्याची घटना पुण्यात घडली आहे.

पाचवीत शिकणाऱ्या मुलीवर नराधमाचा अत्याचार; शाळेतून नेले लॉजवर, पुण्यातील घटना
राजगुरुनगर :इयत्ता पाचवीतील मुलीला शाळेतून लॉजवर नेऊन अत्याचार करून पुन्हा शाळेत आणून सोडण्याची खळबळजनक घटना राजगुरूनगर (ता. खेड) जवळच्या राक्षेवाडीत घडली आहे. या प्रकरणी कल्याण सोनबा राक्षे (वय ४२ रा. राक्षेवाडी ता खेड ) या आरोपीवर खेड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून पोलिसांनी अटक केली आहे.
पीडित मुलीचे वडील व आरोपी हे मित्र होते .आरोपीचे पीडित मुलीच्या घरी नेहमी येणे जाणे असे. आरोपीने तुला वडिलांनी बोलवले असे सांगून जिल्हा परिषदेच्या शाळेतून मुलीला नेऊन लॉजवर अत्याचार करून पुन्हा शाळेत आणून सोडले. मुलीने घडलेला प्रकार आईला सांगितला.मुलीच्या आईने खेड पोलिसांत शुक्रवारी (दि २३) तक्रार दिली. शाळेतून अल्पवयीन मुलीला घेउन जाऊन अत्याचार झाल्याने ग्रामस्थांनी शिक्षकांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.