निर्माणाधीन इमारतीच्या टाकीत पडून ८ वर्षाच्या मुलाचा मृत्यू, विकासकावर गुन्हा दाखल 

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 7, 2023 00:24 IST2023-04-07T00:23:29+5:302023-04-07T00:24:08+5:30

मीरारोड पोलिसांनी विकासका वर गुन्हा दाखल केला आहे. 

An 8-year-old boy died after falling into the tank of an under-construction building, a case was registered against the developer | निर्माणाधीन इमारतीच्या टाकीत पडून ८ वर्षाच्या मुलाचा मृत्यू, विकासकावर गुन्हा दाखल 

निर्माणाधीन इमारतीच्या टाकीत पडून ८ वर्षाच्या मुलाचा मृत्यू, विकासकावर गुन्हा दाखल 

मीरारोड - मीरारोडच्या रामदेव पार्क भागात बांधकाम सुरु असलेल्या इमारतीत विकत घेतलेल्या घराची पाहणी करण्यास गेलेल्या कुटुंबातील ८ वर्षाचा मुलगा पाण्याच्या टाकीत पडून मरण पावला होता. त्या प्रकरणी मीरारोड पोलिसांनी विकासका वर गुन्हा दाखल केला आहे. 

येथे सावलिया एव्हेन्यू नावाने इमारतीचे बांधकाम सुरु आहे.  उमेशकुमार मिश्रा यांनी ७ व्या मजल्यावर घर घेतले आलस्याने काम पाहण्यासाठी ते वडील श्रीनारायण मिश्रा आणि दोन मुलं पियुष व कौशल सह १ एप्रिल रोजी सायंकाळी गेले होते. त्यावेळी ८ वर्षाचा कौशल हा कुठे दिसत नसल्याचे पाहून त्याचा शोध घेतला असता तो इमारतीच्या आवारातील भूमिगत उघड्या टाकीत पडलेला आढळला. 

त्याला नजीकच्या रुग्णालयात उपचारासाठी नेले असता त्याचा आधीच मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. मीरारोड पोलीस ठाण्यात या प्रकरणी ४ एप्रिल रोजी विकासक रोशनलाल मालू आणि डुंगर मेहरा यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 
 

Web Title: An 8-year-old boy died after falling into the tank of an under-construction building, a case was registered against the developer